दिव्या गायकवाड यांच्या मागण्या मनपा आयुक्तांनी केल्या मान्य

दिव्या गायकवाड यांच्या मागण्या मनपा आयुक्तांनी केल्या मान्य

NMC commissioner accepts Divya Gaikwad's demands

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट माजी नगरसेवक दिव्या वैभव गायकवाड यांनी घेतली व घरातला कर्ता पुरुष गमावला असेल किंवा आईवडील गमावले असतील याकरता महापालिकेने अर्थसाहाय्य देण्याकरता योजना सुरू केल्या बद्दल त्यांचे आभार मानले व काही अटी शर्यती मध्ये शिथिलता व वाढ करण्याची मागणी केली :

१) COVID मुळे पती गमावलेल्या महिलांकरिता अर्थसहाय्य मिळण्याचे वय मर्यादा 50 वरून 70 करण्याची मागणी केली.

२) COVID मुळे पती गमावलेल्या महिलांना महापालिकेमार्फत अर्थसहाय्य मिळण्याकरता लग्नाचे सर्टिफिकेट बंधनकारक आहे ही अट बंधनकारक न करता शिथिल करून राशन कार्ड किंवा इतर कुठले लग्नाचे पुरावे/कागदपत्रे सादर करता येतील अशी मागणी करून अटी शिथिल करण्यास विनंती केली आहे.

३) महाराष्ट्रात एकमेव महिला बस चालक योगिता माने एन.एम.एम.टी मध्ये तेजस्विनी बस गेली तीन वर्षाहून अधिक काळ चालवत आहे व इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे व आजपर्यंत एकही अपघात त्यांच्या बसला घडलेलं नाही, अशा एकमेव महिला चालक योगिता माने यांना एन.एम.एम.टी मध्ये कायमस्वरूपी करून घेण्यात यावे अशी मागणी केली.

४) 18+ नवी मुंबईच्या नागरिकांकरिता लवकरात लवकर COVID _19 लस महापालिकेच्या प्रत्येक केंद्रात उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

५) नवी मुंबईतील रहिवासी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा नागरिकांकरिता इतर कागदपत्रे सादर करून COVID_19 लस घेण्याकरता विशेष कॅम्प घेण्याची विनंती केली.

तसेच प्रभाग क्रमांक 64 मधील प्रलंबित कामे, विषयांवर आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत