दिवंगत आमदार टी. एम. कांबळे आणि त्यांचा रिपब्लिकन संकल्प !

दिवंगत आमदार टी. एम. कांबळे आणि त्यांचा रिपब्लिकन संकल्प !

Late MLA T. M. Kamble and his Republican resolve!

-प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर

1) १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा निजाम राजवटीतून मुक्त झाला. १९५६ पासून मराठवाडा मराठी भाषिक म्हणून मराठवाड्यात विलीन झाला हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९३८ पासून कार्यरत होता. १९४८ ते १९५६ काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीतील अनेक कार्यकर्ते निष्ठेने कार्यरत होते .विशेषतः मा. बी एस मोरे , मा व्ही एल सूर्यवंशी यांचे योगदान मोठे आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीतील मा हरिहरराव सोनुले हे १९५७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेडूलड कास्ट फेडेरेशन च्या तिकिटावर प्रचंड मताने विजयी झाले १९७२ ला उदगीर विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे मा. खादीवाले विजयी झाले. अन्यथा एकही रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता नेता निवडणूक प्रक्रियेतून आमदार झाला नाही बौद्ध समाजाचे पॅन्थर तथा रिपब्लिकन पक्षाचे केवळ मा टी एम कांबळे हे एकमेव राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचे आमदार झाले त्यांचा ९ जुलै हा जन्मदिवस !! मा. नामदेव ढसाळ, मा राजा ढाले, प्रा अरुण कांबळे, मा. रामदास आठवले, मा. दादासाहेब गवई याच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थर ते रिपब्लिकन पक्ष असा प्रवास मा टी एम कांबळे झाला स्वतंत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या पक्षाची स्थापना खुल्या पात्राच्या अनुषंगाने रिपब्लिकन चळवळीचा संकल्प आखला होता पण तो संकल्प अनेक कारणामुळे अधा-अधुरा राहिला त्यापैकीच २८ सप्टेंबर २०१३ रोजीच मा टी एम कांबळे यांचं निधन हे एक कारण ! त्यांच्या १९७७ ते २००९ काळातील रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन !! मा टी एम कांबळे यांचे जीवन आणि रिपब्लिकन नेता म्हणून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चालविलेली पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळ याचे विविध पैलू आहेत त्यापैकी काही पैलूंचे स्मरण आजच्या दिनी करणे उचित वाटते म्हणून हा प्रयत्न !

2) नऊ जुलै 1954 मध्ये कांबळे यांचा जन्म हैदराबाद स्टेट मध्ये समावेशित असलेल्या लातूर जिल्ह्यात झाला टी एम काम्बले हे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले दलित चळवळीतील पॅंथर! दलित चळवळीतील शिक्षण घेतलेले तत्कालीन उच्च शिक्षित नौकरीच्या शोधात असताना रिपब्लिकन चळवळीत टी एम काम्बले पूर्ण वेळे राहिले हे त्यांचे वेगळेपण ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये 1974 ते 2009 पर्यंत सक्रीय होते. त्यांनी अनेकदा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका लढवल्या त्यात एकदाही यश आले नाही म्हणून त्यांचा चार दशकाचा चळवळीतील जबाबदार सहप्रवासी मित्र म्हणून मला त्यांच्या निवडणुकीतील पराजयाविषयी मिश्कीलपणे विचारणा करतात त्याबाबत कधीतरी पुढे मी उलगढ करेन.

3) हैदराबाद स्टेट मध्ये असलेला मराठवाडा 1956 पासून महाराष्ट्रात विलीन झाला. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि आर्थिक विकासात मराठवाडा वगळता इतर प्रदेश भिन्न आहेत. १८५७ मध्ये मुंबई स्टेट मध्ये ब्रिटिश सरकारने मुंबई विद्यापीठाची स्थापना करून उच्च शिक्षणाचे द्वार उपलब्ध करून दिले. नागपूर येथे अनेक शिक्षण संस्था ब्रिटिश काळात निर्माण झाल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनि मिलिंद महाविद्यालय १९५० मध्ये काढले त्यामुळे विकासासाठी आणि समाजपरिवर्तनाची आवश्यक असलेली संसाधने या प्रदेशात निजामी राजवटीमुळे आणि १९६० नंतर निजामी प्रवृत्तीच्या सर्व पक्षीय राजकीय नेत्यामुळे या भागातील विकासाचा असमतोल इतर प्रदेशाशी तुलना करता दिसून येतो.

4) मराठवाडा हा महाराष्ट्रातील अविकसित सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रात आहे याबाबतचे प्रतिबिंब सरकार दरबारी दिसून येते. मराठवाड्यातील आंबेडकरी कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्या प्रदेशातील आंबेडकरेत्तर चळवळीतील कार्यकर्ते नेते आणि काँग्रेस पक्ष जसा जबाबदार आहे तसे रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी अन्यायच केला आहे. 1962 ते 2019 या काळामध्ये रिपब्लिकन गटाने ाँग्रेस तर कधी विरोधी आघाडीमध्ये राहून विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सत्तेचा मलिदा चाखला. तोच न्याय मराठवाड्यातील आंबेडकरी कार्यकर्त्याला लाभला नाही याची खंत वेळोवेळी कांबळे यांना जाणवत असे तसेच आज देखील आंबेडकरी चळवळीतील तमाम मराठवाड्यातील कार्यकर्त्याला याची अनुभूती वेळोवेळी चिंतन बैठकीत दिसून येते.

5) स्टेट ऑफ हैदराबाद मध्ये मराठवाडा असताना शेड्युल कास्ट फेडरेशनचे नेते हरिहरराव सोनुले यांना पक्षाचे उमेदवारी मिळाले. काँग्रेस पक्षाला पराभूत करून ते विजयी झाले. त्यानंतर 1962 ते 2019 या काळात रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही गटाने युतीच्या लोकसभेच्या जागा लढण्याची संधी दिली नाही. मराठवाड्यातील आठ लोकसभा आणि 48 विधानसभेत जागा आहेत 1990 मध्ये टी एम कांबळे आणि रामदासजी आठवले यांनी शरद पवार यांच्या सोबत काँग्रेस‌- रिपब्लिकन युतीच्या पाच जागा विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्राप्त केल्या. त्यामध्ये एकही रिपब्लिकन उमेदवार निवडून येणार नाही याची व्यवस्था तत्काळातील काँग्रेस पुढाऱ्यांनी केली. रिपब्लिकन पक्षाला सुटलेल्या जागा, त्या मतदार संघातील अन्य पक्षाच्या अथवा अपक्षाला मतदान करून या भागातील काँग्रेस पक्षाने लातूर आणि नांदेड वगळता भाजप सेनेला बळकटी दिली.

6) टी एस शृंगारे या शेडूलड कास्ट फेडेरेशनच्या कार्यकर्त्याला उमेदवारी रिपब्लिकन पक्षाने दिली नाही म्हणून नाविलाजास्तव अन्य पक्षात जाण्याची त्यांना संधी दिली. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा या राखीव मतदार संघातून श्रंगारे निवडून आले केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण मुळे प्राप्त झाले. मराठवाड्यातील मा संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले. बौद्ध समाजाचे एकमेव गेल्या साठ वर्षातील मंत्री झालेले मा संजय बनसोडे आहेत. मराठवाड्याच्या लगत असलेल्या मराठवाड्यात झालेल्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळीचा कब्जा तथा ताबा घेऊन 1972 ते 2019 या काळात या प्रदेशाशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय समस्यांबाबत मुद्दे उपस्थित करून त्या ला विसंगत वर्तन केले. त्यामुळे या प्रदेशात कायम अशांतता गेल्या ४० वर्षांपासून आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले पाहिजे यासाठी या प्रदेशातील अनेक कार्यकर्ते शहीद झाले यांचे स्मारक बांधण्याचा संकल्प 1990 पासून प्रलंबित आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाच्या वतीने 1990 मध्ये शरद पवार यांच्या पक्षाशी सोबत युती करून खाजगी करणार खाजगीकरण आम मध्ये आरक्षण धोरण लागू करण्याचे मान्य केले होते गेल्या तीस वर्षात या करारातील रिपब्लिकन नेत्यांनी पवारांना स्मरण करून दिले नाही.

7) 1972 ते 2019 या काळात रिपब्लिकन चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या मराठवाड्यातील कोणत्याही गटाला व त्या गटाच्या कार्यकर्त्याला त्याच्या गट प्रमुखांकडून युतीमधील विधानसभा-लोकसभेच्या जागा सोडून घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे या प्रदेशातील शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पक्षाचे नेते रिपब्लिकन चळवळीच्या प्रमुखाशी प्रेमाचे आणि या प्रदेशातील आंबेडकरी समाजाबरोबर असैविधानिक आणि गैरमानावतावादी वर्तन करतात. जनतेच्या भावनेशी चांगल्या पद्धतीने हेटाळणी करतात. याची अनुभूती कांबळे आणि आणि त्यांच्यासोबत असलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांना ज्ञात झाली होती म्हणून रिपब्लिकन चळवळीला नेतृत्व देण्याचा संकल्प कांबळे यांनी केला होता. रिपब्लिकन चळवळीतील विविध गटांच्या अनुयायांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी मैत्री करून ठेवले आहे. तरीही या प्रदेशातील तरुणांना नोकऱ्या, उच्च शिक्षणातील संधी, आणि उद्द्योगव्यवसायाला पाठबळ मिळत नाही. डी एल हिवराले, टी एम कांबले , दिलीप जगताप, यशपाल सरवदे, प्रकाश काम्बले, डॉ जी.के. डोंगरगावकर, विलास सूर्यवंशी, अशोक रामटेके, विजय सोनवणे, प्रमोद रत्नपारखे, रमेश गायकवाड यांच्यासह हजारो ज्ञात अज्ञात उच्चशिक्षित व समाजातील सर्व थरातील कार्यकर्ते गेल्या चार दशकापासून आंबेडकरी चळवळीत निष्ठेने संसदीय राजकारण आणि त्यासाठीचा रिपब्लिकन पक्ष, बौद्ध धम्म चळवळ, मंडल आयोग, गायरान जमिनी मालकीहक्क, जातीय अन्याय अत्याचार प्रतिबंधक, सरकारी नौकरीतल अनुशेषाचा लढा, औद्योगीकरणासाठी लढ्याचे प्रमुख म्हणून आम्ही सर्वांनी टी एम कांबले यांच्या नेतृत्व मान्य करुन चळवळ केली.

8) जागतिकीकरणाने भारतीय समाजापुढे विशेषतः आंबेडकरी समाजापुढे जगण्याचे मोठे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रात आणि देशात रिपब्लिकन संकल्प यशस्वी करण्यासाठी नव्या नेतृत्वाचा शोधात हजारो वर्षांपासून समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला आंबेडकरी समाज आस लावून आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत