दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता

दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता

३ जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

पुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर के ले आहे. त्यानुसार जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि निकाल तयार करण्याची कार्यपद्धती बुधवारी जाहीर के ली आहे.

राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी १० जूनला यूट्यूबद्वारे मूल्यमापनाबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे. मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते  वर्गशिक्षकांकडे सादर करणे, वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळा समितीकडे सादर करणे यासाठी ११ जून ते २० जूनची मुदत आहे. वर्ग शिक्षकांनी तयार के लेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षा आणि नियमन करून ते प्रमाणित करण्यासाठी १२ जून ते २४ जून ही मुदत देण्यात आली आहे. निकाल समितीने प्रमाणित के लेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरण्यासाठी २१ जून ते ३० जून ही मुदत असेल. २५ जून ते ३० जून या कालावधीत निकाल समितीने प्रमाणित के लेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक  स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत.

३ जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्य मंडळाकडून अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सवलतीच्या गुणांची कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर

शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदवावेत. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नयेत. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत