दशिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनलाही झाली कोरोनाची लागण

दशिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनलाही झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढू लागला आहे. कलाविश्वालाही या संसर्गाने विळख्यात घेतले आहे. त्यातच दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यालाही कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्यांच्या चाहत्यांना याबाबतची माहिती देत आपल्या प्रकृतीची चिंता न करण्याची विनंती केली. सोबतच आपली प्रकृती लवकरच सुधारेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 

कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच त्याने विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्याने कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याची विनंती करत, कोरोना लसीकरण मोहिमेतही सहभागी होण्याची विनंती केली आहे.

अल्लू अर्जुन याने सोशल मीडियावर आपण कोरोनाबाधित झाल्याचे सांगताच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थनेचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. कोणी, गेट वेल सून म्हणत त्याला धीर दिला, तर कोणी त्याला या युद्धात जिंकण्यासाठी सदिच्छा दिल्या. या लोकप्रिय कलाकारापोटी चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यांचे संदेश सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले होते. 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत