तो, ती आणि त्यांच स्वप्न !

तो, ती आणि त्यांच स्वप्न !

तो अन ती एकांतात अन सुंदर शांत आशा,निसर्गरम्य वातावरणात नेहमी फिरायला जायचे..असेच एका दिवशी नेहमी प्रमाणे जात असताना तीच लक्ष एक सुंदर बिल्डींग मध्ये असलेल्या फ्लॅट कडे गेलं..अन तिच्या मनामध्ये फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न रंगू लागलं..
शेवटी मुलींची जात ती..तिच्या मनातच नाही राहील तिने त्याला मनातलं सांगूनच टाकलं..

ती- ऐक ना..तिकडे बघ ना ती बिल्डींग किती सुंदर दिसते ना..

तो- हो ग खूप मज्जा येईल ना आशा ठिकाणी राहायला.. तो सहज बोलून गेला

ती- (अतिशय आनंदून)
खरच रे माझ्या मनातल बोलला खरच खूप मज्जा येईल ना अशा ठिकाणी राहायला..मला ही असंच वाटत..

तो- दुर्लक्ष्य करत..हो का..

ती- हो ना पुढे आपलं लग्न होईल आपल्या कडे ही असा फ्लॅट असल आपली मुलं बाळ खूप नशीबवान असतील ना या सुंदर बिल्डिंग मध्ये राहतील हो ना…

तो तिच्या प्रत्येक बोलण्याला होकारच देत गेला..पण त्याची परिस्थिती खूप बिकट होती..बाप तर त्याला कळत नव्हतं तेंव्हाच सोडून गेलेला..अन आईच ही नेहमी दुखण चालूच..हे तिला काहीच माहीत नव्हतं..

तो- हो ग खरच ना.. पण त्याच्या मनात आईचं नेहमी आजारी पडन अन आपली हलाक्याची परिस्थिती याचे वारे वाहत होते..त्याने हे तिला कधीच सांगितले नव्हते..

ती- काय रे हो हो करतोय फक्त काय झालं..तू काहीतरी लपवतोस का..

तो- नाही रे तुझ्या पासून काही लपवल का आजपर्यंत..त्याने बळचं हसतं अस म्हणलं..अन ते दोघे घरी निघून गेले..

पण घरी आल्या पासून त्याच्या मनात काही विचार घर करूनच राहिले..या विचारा विचारातच तो आपल्या आईची तब्येत अन फॅमिली सांभाळू लागला..पण त्याच काही मन लागत नव्हतं..

एक दिवस त्याची आई खुप आजारी पडली अन त्याने आईला दवाखान्यात ऍडमिट केलं..अन परत त्याच विचारात रमून गेला..अशा परिस्थितीत त्याला वाटलं आपण तिला सगळं सांगितलेलं कधीही चांगलं..त्याने ठरवलं अन खूप दिवसांन तिला भेटायला बोलवलं..

तो आणि ती बऱ्याच दिवसानी परत फिरायला एकत्र आले होते…

रम्य संध्याकाळ,एक अतिशय आवडत गाण आणि ते दोघच….

साधारण वीस एक मिनिट प्रवास झाला आणि आज त्याच काहीतरी खटकल आहे ते तिने ओळखल..अगदी नेहमीप्रमाणे मनकवडीच ती, त्याचा चेहरा पाहुन त्याच मन जाणणारी ती अगदी मूर्ख मूर्ख हसत त्याला विचारू लागली..

ती-काय रे काय झाल..आज एकदम शांत शांत…

तो- काही नाही ग!

ती – माझ्याशी तरी खोट नको बोलूस रे…नाही जमणार तुला ! आजच नाहीस तर गेले काही दिवस तू खुप वेगळा आणि शांत शांत वाटतोस !

बोल मला काय विषय आहे नक्की ?

तो -खर सांगू का..? तुला आज काही सांगायलाच मी हां बाहेर जायचा प्लान आखला आहे..पण विषय कसा काढू ह्याचा अंदाज घेत होतो…

ती -बोल रे जे मनात असेल ते बोल..तुला असा अस्वस्थ नाही पाहू शकत मी..

तो-ऐक ना..आपण जो फ्लॅटच स्वप्न पाहत होतो ना..ते कधीच पूर्ण नाही होऊ शकत..

ती- का रे का अस बोलतोस.. काय झालं..सांग ना..

तो- खरं सांगू तुला मी आज पर्यंत माझ्या परिस्थिती विषयी काहीच सांगितलं नाही रे…लहान असताना वडील सोडून गेले..आईची पण तब्येत कधीच ठीक नसते..मी एकटाच माझं कुटुंब सांभाळतो..त्यामुळे एवढ्या मोठया फ्लॅट मध्ये राहण्याचं स्वप्न कधी पूर्ण करू शकेल नाही सांगत येणार…
काय रे तू पण अशा मुलांसोबत प्रेम केलंय जो तुझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही

ती – काही वेळ तिच्या डोळ्यातील अश्रूंना थांबवू शकली नाही..अगदी गप्प होत त्याच्या गळ्यात पडली अन रडू लागली..एवढं सगळं लपवून ठेवलं माझ्या पासून..का बरं रे..

तो निशब्द काही वेळ…..गाडी बाजूला घेतली आणि धीर करुन म्हणाला..

तो-आपण पाहिला तेव्हा मला सुद्धा तुझ्याइतकाच आवडला तो फ्लॅट… आणि तू पण एवढी हरवून गेली होतीस कि इतकी आनंदी कधीच पाहिल नव्हत मी तुला..अगदी घर कस सजवायच हे सुद्धा संगितलस तेव्हाच मला..त्यामुळे मी तुला अडवूच शकलो नाही.आणि मी ठरवल काहीही करुन हा फ्लॅट घ्यायचाच म्हणून..पण आज दोन महीने झाल मी आईच्या दुखण्याला घेऊन रोज झगड़तोय आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी..सगळे खटाटोप करुन पाहिले. पण माझ्याच्याने इतक्यात शक्य होत नाही हेच खर..यात पैशाच सोंग नाही आणता येत मला..

मी हारलो ग ! मला माफ कर !अस म्हणून एखाद्या लहान मुलांसारखा तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागला..

आता मात्र ती स्तब्ध झाली..तिला काहीच कळेना झाल..त्याला अस पहायची सवयच नव्हती तिला..काही वेळातच नकळत त्याच्या बरोबर ती सुद्धा ढसा ढसा रडु लागली…बराच वेळ दोघ एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते..खुप वेळ रडुंन झाल्यावर आता तिला ज़रा मोकळ मोकळ वाटत होत.बहुधा या रडण्याने या घराची स्वप्न सुद्धा वाहून गेली असावीत तिची…आणि मग भानावर येत या अंकाची सूत्र तिने हातात घेतली..

ती– अरे वेड्या माणसा..वाघ आहे नारे तू माझा आणि असा मूळु मुळु रडतोस !
नाही ना जमत आपल्याला आता..ठीक आहे…आयुष्य संपल का आपल..?
आता नाही तर नंतर पाहू..शेवटी त्या घरात मी तुझ्याबरोबरच रहायची स्वप्न पहात होते ना ! पण तूच जर असा ओझ्याखाली दबलेला असलास तर काय सुखी जगणार होतो आपण तिथ…सोडुया आपण तो वेडा नाद आधी तुझ्या आईला ठीक करूया पागल तुझी आई म्हणजे माझी पण ना.. !

काहीही गरज नाही मला त्या फ्लॅट ची आज नाही तर जेव्हा जमेल तेव्हा घेऊ आपण घर..जेव्हा तू अगदी आईला आजारातून बाहेर आणून एक comfort असशील अगदी तेव्हाच…नाही तर कधीच नाही..

फक्त वाईट याच वाटत कि तू मला तेव्हाच सगळ्या परिस्थिती विषयी समजावल असतस तरी मी समजले असते..अन तुला त्रास होईल इतकी स्वप्न नसती पाहिली..रे..

आणि आज पहिल आणि शेवटच सांगते..मला तू आहेस असा सर्वात जास्त महत्वाचा आहेस..माझा हसत खेळत राहणारा प्रत्येक परिस्थिती मध्ये रिअल हीरो आहेस तू ..तुझ्या बिनधास्त राहण्यावर मी सर्वात जास्त प्रेम केलय..आणि जर का तुझा हां स्वभाव कोणत्याही गोष्टीने हरवणार असेल तर त्या गोष्टीची किंमत माझ्या दृष्टीने शुन्य आहे..परत जर का असा अस्वस्थ झालास तर मग मात्र माझ्यासारखी कोणी वाइट नाही..कारण मी सर्व काही सहन करू शकते पण तुला असा हरलेला मात्र नाही स्वीकारु शकत मी…

तीच हे सगळं बोलणं ऐकून तो भणातच नाही राहिला अगदी तिला कवटाळून प्रेमानं मिठी मारली..अन तिच्या गळ्यात पडून रडू लागला..दोघ एकमेकांच्या गळ्यात पडून सगळं मन मोकळं करू लागले..बराच वेळ रडत तसेच बंद गाडीत बसले होते..

आता मात्र भानावर यायची त्याची वेळ होती..त्याने गाडीला स्टार्टर मारला आणि मस्तपैकी सुसाट गाडी घेऊन हाईवेच्या दिशेने निघाला…

बऱ्याच दिवसानी तिला आज तो पुन्हा एकदा पहिल्यासारखा स्वतःला भेटला होता अस त्याला वाटत होते..आणि अर्थात त्याला पहिल्यासारखा पाहुन तिला पहिल्यांदा भेटलेला तो आठवला..

  • गोरख वराडे..✍️✍️
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत