तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात

It was expensive to cut a cake with a sword to celebrate a birthday

उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे सर्वस्तरातून टीका करण्यात येत असून अश्या हुल्लडबाज व गुन्हेगारीवृत्तीच्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अखेर उल्हासनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर साथीदारांनाचा शोध सुरु आहे.

cake cutting 23318088 202004406031

आजची तरुणपिढी ज्या मार्गाने जात आहे हि खर्च चिंतेची बाब आहे. कारण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण मंडळी काहीही हुल्लडबाजी करतात आणि ते त्यांच्याच अंगाशी येतं. हाथात तलवार घेऊन दहशतबाजी करणाऱ्या तरुणानंतर आता भररस्त्यात तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा हुल्लडबाज तरुणांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतो. शहरात रात्रीच्या १० नंतर मुख्य रस्ते, चौक, गार्डन, मैदान, शासकीय कार्यालयाचें प्रांगण, नशेखोर, गर्दुल्ले, हुल्लडबाज तरुणांचे अड्डे झाले असून त्यांची दहशद निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत