डोळ्यातून कॉन्टॅक्ट लेन्स काढताना त्रास होतोय? ही आहे सोपी पध्दत, पाहा VIDEO

डोळ्यातून कॉन्टॅक्ट लेन्स काढताना त्रास होतोय? ही आहे सोपी पध्दत, पाहा VIDEO

कॉन्टॅक्ट लेन्सेस (Contact Lenses) वापरण्याची तुमची तयारी नसेल किंवा तुम्हाला त्याबाबत अनुभव नसेल तर पहिल्यांदा या लेन्स वापरताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी डोळ्यांमध्ये (Eyes) कॉन्टॅक्ट लेन्स घालणं आणि त्या काढून ठेवणं हे देखील अवघड वाटू लागतं. अनेकदा कॉन्टॅक्ट लेन्स काढल्यावर लोकांना डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळे लाल होणे, असे अनुभव येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी या लेन्स योग्य असतील, परंतु त्या काढणे हे कठीण वाटते. तसेच नियमित वापर करणाऱ्यांना देखील या लेन्स त्रासदायक वाटू शकतात. त्यामुळे लेन्स वापरणाऱ्यांनी आपत्कालीन स्थिती उदभवल्यास तातडीने नेत्र तज्ज्ञांशी (Eye Specialist) संपर्क साधावा असा सल्ला नेहमी दिला जातो.

परंतु, डोळ्यांना इजा न पोहोचवता, बुब्बुळाशी (Eyeballs) शारिरीक संपर्क कमी ठेवत लेन्स (Lenses) सुरक्षितपणे काढण्याचा कोणता मार्ग आहे का, तर हो या प्रश्नाचे हे आहे उत्तर…

टिकटॉक युझर लाला (Tik Tok User Lala) हिला डोळ्यांवर कोणताही ताण न आणता आपले कॉन्टॅक्ट लेन्स काढण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग सापडला आहे. तिच्या या व्हिडीओला यापूर्वीच 2 दशलक्ष व्हिह्यूज (Views) मिळाले आहेत.

या टिकटॉक व्हिडीओमध्ये लालाने कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यातून सहज आणि सुरक्षितपणे कशा काढायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ती म्हणते, की लेन्स वापरत असलेल्या व्यक्तीने लेन्स काढण्यापूर्वी डोळे मागील बाजूला हलवू नयेत. त्याऐवजी त्यांनी सरळ समोर बघावे आणि डोळ्याच्या पापण्यांची किंचित हालचाल करावी. या व्हिडीओत लाला लेन्स काढण्यापूर्वी अगदी सहजतेने तिच्या वरच्या आणि खालच्या पाण्यांची हालचाल कशी करावी हे दाखवते. या हालचालीनंतर थोडसं लुकलुकल्यासारखं दिसेल आणि कोणताही शारिरीक स्पर्श न करता लेन्स आपोआप बाहेर येतील. या क्लिपचे तपशीलवार वर्णन करताना ती म्हणते,की मी माझे डोळे थोडसे बाजूला खेचले, थोडे बाजूला पाहिले आणि लुकलुकल्या सारखे केले. हाच आहे सोप्या पध्दतीने लेन्स काढण्याचा एकमेव मार्ग. मला अजूनही लेन्स घालताना धडपड करावी लागते, मात्र लेन्स काढून टाकताना मला अत्यंत कमी प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. डोळ्याची खोबण (Hack) लेन्स वापरणाऱ्यांसाठी कधी फायदेशीर ठरते किंवा कधी फायदेशीर ठरत नाही. परंतु, या प्रकारे लेन्स काढण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करावा. यामुळे लेन्स वापरणाऱ्या अनेकांचे दैनंदिन जीवन नक्कीच सुलभ होईल असे लाला हिने स्पष्ट केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत