डॉ. भरत वटवानींच्या वाढदिवसानिमित्त १०८ मनोरुग्णांची तपासणी

डॉ. भरत वटवानींच्या वाढदिवसानिमित्त १०८ मनोरुग्णांची तपासणी

checkup of petients for the occasion of dr. bharat vatwani's birthday

नवी मुंबई – ‘वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा’ या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम नित्यनियमाने प्रभातच्या माध्यमातून राबविला जातो. अशाच प्रकारे जगातील पहिले सौर ऊर्जेवर आधारित फिरते नेत्रालयाने कर्जतमधील छोट्याशा वस्तीमध्ये भेट डीयून अनोख्या पद्धतीने स्त्यावरील मनोरुग्णांचे उपचार व पुनर्भेट यासाठी गेली पंचवीस वर्ष काम करणारे रॅमन मॅगसेसे विजेते डॉ. भरत वटवानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सोमवारी दि. २२ जून रोजी डॉ. भरत वटवानी यांच्या वाढदिवसानिमित्त सागर मोहिते व मोहसीन जमादार यांनी कर्जतमधील वस्तीमध्ये नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाची धुरा सांभाळली. नेत्रसेवे बरोबर वृक्षारोपणही करण्याचा देखील कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. मधुकर वारभुवन, जीवन निकम, प्रकाश डुडम, अमित कदम, विकास चव्हाण यांनी सहकार्‍यांसह वृक्षारोपण केले असून यासाठी सकाळी ९ वाजता ओक वनौषधी केंद्र व शंकर पवार (ऐरोली) आणि सौ. जोशी (नेरूळ) यांनी स्वतः बनवलेल्या रोपट्यांची श्रद्धा प्रकल्पामध्ये लागवड करण्यात आली. रुग्णवाहिकेतून जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही डॉ. भरत वटवानी यांनी वृक्ष लागवड देखील केली आणि प्रकल्पामध्ये भरती असणाऱ्या १०८ रुग्णांची देखील तपासणी केली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत