डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर कचऱ्याचा ढीग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर कचऱ्याचा ढीग

garbage in front of dr. babasaheb ambedkar garden at cbd belapur

नवी मुंबई- महानगरपालिकेचे सीबीडी- बेलापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर गेल्या दोन- तीन दिवसांपासून कचऱ्याचा ढीग पडून असल्याने येथील परिसरातील रहिवासीयांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच उद्यानासमोरील रस्ता रहदारीचा असल्याने वाहनचालकांना व येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना देखील या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा त्रास होत आहे. रोज रात्री कोणीतरी येऊन उद्यानासमोर कचऱ्याचा ढीग टाकत असल्याची शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सीबीडी- बेलापूरमधील सेक्टर- २ मध्ये असून उद्यानासमोर रहिवासीयांची घरे असल्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा त्रास येथील नागरिकांना होतो. उद्यानाजवळ लिटिल बीन्स उपलब्ध असूनही कचऱ्याचा ढीग फुटपाथवर पडून असतो. याबाबत येथील रहिवासी स्थानिक नगरसेवकांना तक्रार करणार असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी देखील ते करणार आहेत.

“या उद्यानासमोर मुख्य रस्ता आहे. तसेच जरी सध्या उद्यानाजवळ असणारी शाळा बंद असली तरी त्वरित येथील कचरा हटवला नाही तर शाळा सुरु झाल्यावर शाळकरी मुलांना देखील याचा त्रास होणार आहे. येथील रहिवासीयांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील याठिकाणी आहेत. मात्र तरीही या उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग आहे.”- एजाज खान

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत