डिझेलची शंभराकडे वाटचाल सुरु

डिझेलची शंभराकडे वाटचाल सुरु

Diesel starts moving towards hundreds

मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 34 पैशांनी वाढली आहे तर डिझेलची किंमत 26 पैशांनी वाढली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर हा 104.56 रुपये असून डिझेलचा दर हा 96.42 रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 35 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महाग झालं आहे. गेल्या महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढायला सुरुवात झाली. 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 31 व्या वेळेस वाढ झाली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत