डाॅ रामेश्वर चव्हाण साहेब याना जातेगाव येथील यमाई गौरव पुरस्कार जाहीर

डाॅ रामेश्वर चव्हाण साहेब याना जातेगाव येथील यमाई गौरव पुरस्कार जाहीर

यमाई याञेनिमीत्ताने सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्यसेवा देणार्याचा होणार सन्मान

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पौष पोर्णीमेनिमीत्ताने यमाई याञा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन आरोग्यसेवा देणारे डाॅ रामेश्वर चव्हाण साहेब व अन्य मान्यवराना यमाई गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

सविस्तर असे की गेवराई
तालुक्यातील जातेगाव येथे यमाई याञा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पौष पोर्णीमा निमीत्ताने दि 28 / 1/ 2021 रोजो दु 12 ते 2 या वेळेत भागवताचार्य ह भ प नयनाताई महाराज नाशीकर याचे किर्तन व नंतर महप्रसाद अन्नदाते सौरव कृषी सेवा केद्र जातेगाव तसेच दु यमाई गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत त्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे अ भा छावाचे केद्रीय अध्यक्ष मा नानासाहेब जावळे आरोग्यसेवा देणारे डाॅ पल्लवी झोडपे वैद्यकीय अधिकारी जातेगाव, डाॅ संभाजी जाधव ,डाॅ जिवन कुमार राठोड , डाॅ रामेश्वर चव्हाण,डाॅ राजपाल सोनवने ,डाॅ विलास चव्हाण,डाॅ उध्दव घोडके , राधेशाम चव्हाण आर्मी ,श्रीकृष्ण वडकर पोलीस ,विष्णु सायंबर शिक्षक, भास्कर सोळुके ,पञकार दत्ता वाघमारे पञकार,छाया मुळे अशा वर्कर ,औटी साहेब कृषी ,सुनिल राऊत पाणी वाटप कर्मचारी ,शेख रसुल पाणी वाटप कर्मचारी याना पुरस्कार देण्यात येणार असुन दि 29 / 1 / 2021 रोजी सकाळी रांगोळी स्पर्धा यमाई मंदीर येथे तसेच दु 4 वा यमाई देवी पालखी मिरवनुक दहीहंडी कार्यक्रम होणार आहे अशी माहीती यमाई देवी विश्वस्त मंडळ,यमाई याञा उत्सव कमीटी , समस्त गावकरी मंडळी जातेगाव यानी दिली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत