‘ डान्स दिवाणे ३ ‘ च्या सेटवरिल ‘ या ‘ प्रसिद्ध कोरीयोग्राफरला कोरोनाची लागण

‘ डान्स दिवाणे ३ ‘ च्या सेटवरिल ‘ या ‘ प्रसिद्ध कोरीयोग्राफरला कोरोनाची लागण
th

अफलातून डान्स परफॉर्मन्समुळे छोट्या पडद्यावरील ‘डान्स दिवाणे ३’ हा शो सगळ्याच्या चर्चेचा भाग झाला आहे. ह्या शो मधून छोट्या पडद्यावर डान्स करणाऱ्या मुलांची जिद्द,मेहनत,आवड पाहूनच हा शो सगळ्यांच्या घरा घरात पाहताना आपण बघत आहोत. पण गेल्या काही दिवसांपासून शोच्या सेट वरून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘डान्स दिवाणे ३’ च्या सेटवर १८ क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. याचदम्यान आता ‘डान्स दिवाणे ३’ या शोचा परीक्षक धर्मेश येलांडेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

‘डान्स दिवाणे ३’ या शोमध्ये माधुरी दिक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे तीन परीक्षक असून राघव जुयाल हा या शोचे सूत्रसंचालन करत आहे. धर्मेश ला कोरोनाची लागण झाल्याचे कळल्यास सर्वांना धक्का बसला आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांनी देखील कोरोनाची चाचणी केली पण ती निगेटिव्ह आली.

तसेच मीडिया रिपोर्टनुसार शोच्या निर्मात्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवस धर्मेश शो मध्ये दिसणार नाही ही माहिती समोर आली आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत