डान्सबार चालू असल्याने दोन सिनियर निलंबित आणि दोन एसीपी यांची बदली

डान्सबार चालू असल्याने दोन सिनियर निलंबित आणि दोन एसीपी यांची बदली

डान्सबार चालू असल्याने दोन सिनियर निलंबित आणि दोन एसीपी यांची बदली

नवी मुंबई – नियमांचे उल्लंघन करून डान्सबार सुरु ठेवणाऱ्या तेथील कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून डान्सबार बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या भागात डान्स बार सुरु आहे तेथील पोलीस अधिकारी आणि एसीपी यांना निलंबित करण्यात आले आहे. यात फक्त पोलीस यांचीच चूक आहे का? जिथे डान्सबार चालतो आजुबाजूच्या लोकांना माहीत नसते का? किलोच्या हिशोबाने झोला छाप नेते हे सदर डान्सबार मालकाकडे कॅरम खेळायला भेट देतात का? त्यांनी किती तक्रारी केल्या सदर डान्सबार साठी ? स्थानिक नगरसेवक, याची नैतिक जबाबदारी नव्हती का? तरुन पिढी बरबाद होते हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे रोखप्रतिनिधीच? बरे सदर डान्सबार चालतो तिथे मद्यप्राशन केले जाते, नियमानुसारच का? तेथील उत्पादन शुल्क विभाग काय दिवे लावत होते? त्यांची जबाबदारी नाही का काही? प्रत्येक गोष्टीला पोलीस प्रशासनच जबाबदार का? असे अनेक प्रश्न विविध स्तरावरून उपस्थित केले जात आहेत. कित्येक राजकीय लोकाच्या प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष सहकार्य असणाऱ्या अश्या डान्सबार बद्दल बाकीच्यांनाही जबाबदार ठरवावे, सदर डान्सबार वाल्या चालक / मालक यांच्या कडून महिना भिख घेणाऱ्या लोकांची लिस्ट काढली तर, थोबाड वर करून स्वताला साजूक समजनाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडेल.

काही दिवसाने सदर सील झालेला बार परत चालू होईल याबद्दल शेंबड्या पोरालाही सांगायची गरज पडणार नाही. त्यामुळे,अश्या असामाजिक तत्वाद्वारे चालु असणाऱ्या अवैध धंध्यासाठी परीसरातील लोक ही तीतकेच जबाबदार आहेत. पोलीस डान्सबार जाऊन पैसे उडवायला आणि बरबाद होण्यासाठी सांगत नसतात, पोलीस काल ही रक्षक होते आहेत आणि राहतील. असे नागरिकांचे मत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत