ठाण्यातील गंभीर परिस्थितीबाबत भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

ठाण्यातील गंभीर परिस्थितीबाबत भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

ठाणे : ठाणे शहरात ऑक्सिजन टंचाई, अपुरे बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई, टोसिझुमैब इंजेक्शनचा अनावश्यक वापर आदींबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

7936db14 c8eb 4885 8f0b 0251f35d76b6

त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या सहकार्याने भारत विकास परिषदेकडून ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी असल्याचे भाजपाकडून बैठकीत सांगण्यात आले. त्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका व्यक्त केली.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. या वेळी माझ्याबरोबरच भाजपाचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे, महापालिकेतील गटनेते मनोहरजी डुंबरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर साहेब, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेशजी देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कैलासजी पवार, भाजपाचे डॉ. महेशजी जोशी आदींची उपस्थिती होती. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही उपस्थित राहून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या रुग्णालयासाठी आमदार निधी देण्याची तयारी असल्याचे मी नमूद केले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत