ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयात अकाउंटन्सी म्युझियम चे उद्घाटन…

ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयात अकाउंटन्सी म्युझियम चे उद्घाटन…
WhatsApp Image 2021 08 30 at 3.56.48 PM 1

सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व जोशी-बेडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयात अकाउंटन्सी म्युझियम चे उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ चा्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष निहार जंबू सरिया तसेच वेस्टर्न रिजन चे अध्यक्ष मनीष गाडिया व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक तसेच विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार त्रिविक्रम बेंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी सी ए इन्स्टिट्यूट ठाणे विभागाचे अध्यक्ष शिवभगवान असावा तसेच मंगेश कींनारे कमलेश साबू, विनोद नवरे,चेतन छाडवा, प्राचार्य किशोर पिशोरी,महेश भिवंडीकर ,

WhatsApp Image 2021 08 30 at 3.56.48 PM 2

राहुल घरत असे अनेक मान्यवर उपस्थित होते अकाउंटन्सी विभागाचे प्रमुख व कार्यक्रमांचे समन्वयक प्राध्यापक योगेश प्रसादे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . ठाण्यातील हे पहिलेच अकाउंटन्सी म्युझियम असून निहार जम्बु सारिया यांनी महाविद्यालयाचे या उपक्रमासाठी कौतुक केले. प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी याप्रसंगी बोलताना वेदांचा व उपनिषदांचा दाखला देत समाजजीवनातील अकाउंटिंग चे महत्व अधोरेखित केली.विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर प्रियंवदा टोकेकर डॉक्टर महेश पाटील ग्रंथपाल प्राध्यापक नारायण बारसे अकाउंट विभागाचे प्राध्यापक नितीन वाढविंडे अतुल राऊत मधुरा जोशी दिप्ती पाटील सुरेंद्र नाडर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीलक्ष्मी या विद्यार्थिनी ने केले.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत