‘ठाकरे सरकारला गोर गरिब पोरांची चिंता नाही’

‘ठाकरे सरकारला गोर गरिब पोरांची चिंता नाही’

'Thackeray government not worried about poor kids'

मुंबई : “ठाकरे सरकारला केवळ आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील गोर गरिब पोरांची चिंता नाही. भाषणबाजीत केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचं. आज अनेक विद्यार्थी परीक्षेच्या, मुलाखतीच्या, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. हे सरकार नेमकं काय करतंय, वसूली करायला सांगण्यात व्यस्त आहे की काय?”, अशी तोफ भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी ठाकरे सरकारवर डागली.“हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. वाझेसारख्या अधिकाऱ्यांना वसूलीचे आदेश देण्यात गुंग आहे. या सरकारला आदित्य ठाकरे, पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. आपली पोरं आमदार, खासदार मंत्री कशी होतील, याची या सरकारमधील मंत्र्यांना चिंता आहे. गोरगरिब पोरांचं या सरकारला काहीही देणंघेणं नाहीय. पण सरकारमधील मंत्र्यांनी जर स्वप्निलच्या आईचा आक्रोश ऐकला तर त्यांना समजेल गोरगरिब पोराबाळांचं दु:ख काय आहे… ‘केम छो वरळी…’ म्हणणं सोपंय, पण या लेकरांशी बोलणार कोण? पोरांच्या हिताचे निर्णय घेणार कोण?” अशा प्रश्नांच्या भडीमारासह आमदार सातपुते यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत