टोकियो ऑलिम्पिक मध्ये कोरोनाचा सिरखावा

टोकियो ऑलिम्पिक मध्ये कोरोनाचा सिरखावा

Corona's title at the Tokyo Olympics

Tokyo Olympic 2020 : जपानची राजधानी असलेल्या टोकियो या ठिकाणी या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडणार आहेत. या स्पर्धा ज्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत त्या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडल्याचं आयोजकानी मान्य केलं आहे.

शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेल्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पण आयोजकांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. आता ज्या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे त्या ठिकाणीच कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या एका खेळाडूला या गावातून बाहेर पाठवण्यात आलं असून टोकियोमध्ये त्याला एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे

WhatsApp Image 2021 07 17 at 12.10.01 PM

स्पर्धेवर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत असं गेल्या आठवड्यातच जपानच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं

ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होत आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घालण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी आणीबाणी लागू केल्यामुळं टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे. त्यामुळं यंदाचं ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत