जोशी-बेडेकर महाविद्यालयाला मिळाला एशिया टुडे शैक्षणिक पुरस्कार 2021

जोशी-बेडेकर महाविद्यालयाला मिळाला एशिया टुडे शैक्षणिक पुरस्कार 2021

नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रणाली व वैविध्यपूर्ण उपक्रमा साठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानाचा एशिया टुडे शैक्षणिक पुरस्कार यावर्षी जोशी बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाला प्राप्त झाला.

कल्पक अध्यापनपद्धती, संशोधन, रोजगारनिर्मिती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, माजी विद्यार्थ्यांचे योगदान, उद्योजकता विकास इत्यादी परिमाणांचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.

‘ठाणे जिल्ह्यातील संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्तम कला व वाणिज्य महाविद्यालय’ हा मानाचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून महाविद्यालयाला मिळाला. संपूर्ण आशिया मधील 42 महाविद्यालयांमधून
सतरावा क्रमांक प्राप्त झाला आहे.

पुरस्कार प्रदान कार्यक्रम दिनांक 25 मार्च रोजी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू तसेच प्रख्यात अभिनेत्री जयाप्रदा तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक व उपप्राचार्या प्रियंवदा टोकेकर यांना प्रदान करण्यात आला. इंडिया टुडे या पुरस्काराचा माध्यम प्रायोजक असून एज्युकेशन टुडे ऑनलाइन माध्यमप्रायोजक आहे.

“या पुरस्कारामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाची पोचपावती मिळाली व हाती घेतलेले काम अधिकाधिक वर्धिष्णू व्हावे अशी ऊर्जा मिळाली” असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक म्हणाल्या . विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विजय बेडेकर यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत