जेवणानंतर लगेचच झोपणे आरोग्यासाठी धोकादायक!

जेवणानंतर लगेचच झोपणे आरोग्यासाठी धोकादायक!

अनेकांना जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. मात्र हि सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात… 

● जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. 

● यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होते आणि ते छातीत जाते. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. 

● जेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

● अशाने कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. 

● जेवण आणि झोपण्यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर असायला पाहिजे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

● अशाने पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही आहे. कारण तातडीने झोपल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने पित्त वाढते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत