जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजन यशाची गुरुकिल्ली

WhatsApp Image 2021 11 15 at 2.22.15 PM

जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजन यशाची गुरुकिल्ली

अर्जुन पुरुस्कार विजेत्या ललिता बाबर यांचे प्रतिपादन

व्ही पी एम च्या क्रीडा प्रबोधानीचे शानदार उद्घाटन

ठाणे, सोमवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी सात  वाजता विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचे अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलम्पिक धावपटू आणि सध्या उरण च्या प्रांताधिकारी असलेल्या ललिता बाबर – भोसले यांच्या हस्ते  उद्घाटन झाले. मंडळाच्या मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, डॉ. विजय बेडेकर होते. विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉ. महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रबोधनीच्या उद्घटनाप्रसंगी स्ट्रायडर्स ( Striders) प्रबोधिनीचे श्री. दीपक लोंढे, विद्या प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री जयंत कयाळ, श्री.उत्तम जोशी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते . विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि कर्मचारी व उत्साही खेळाडू  विद्यार्थ्यांनी  मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

WhatsApp Image 2021 11 15 at 2.22.15 PM 2

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत शारीरिक सुदृढता लागण्यासाठी खेळांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे क्रीडा संस्कृती ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या हेतूने विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी डॉ महेश बेडेकर यांच्या प्रयत्नातून ही क्रीडा प्रबोधिनी साकारली आहे

आजच्या उद्घाटन समारंभाच्या प्रास्ताविकात डॉ महेश बेडेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यास खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची  गरज आहे शारीरिक सुदृढता वाढण्या सोबतच खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी देखील क्रीडा प्रबोधिनी उपयोगी ठरेल

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलम्पिक धावपटू ललिता बाबर भोसले यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनी चा अधिकाधिक लाभ घेऊन राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्वल करण्याचा संदेश दिला. कोरोना महामारी च्या परिप्रेक्षात आपण सर्वजण शारीरिक आरोग्य बद्दल जागरूक होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांना देखील त्यांनी विद्यार्थ्यांसोबत क्रीडांगणावर येऊन शारीरिक क्षमता वृद्धिंगत करण्यास संदर्भात मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातून येऊन क्रीडा क्षेत्रात आज जे  नाव कमावले आहे त्यामागे माझी जिद्द ,मेहनत,शिस्त आणि योग्य नियोजनाचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले .

विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना असे मत व्यक्त केले की विद्यार्थ्यांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले जंक फूड टाळावे व क्रीडांगणावर जाऊन भरपूर खेळावे. सुदृढ शरीरातच निरोगी व ऊर्जस्वल मनाचा वास असतो असे ते म्हणाले. या प्रसंगी , स्ट्रायडर्स ( Striders)  या क्रीडा क्षेत्रातील संस्थेचे श्री दीपक लोंढे यांनीदेखील आरोग्य आणि खेळाचे महत्व सांगून  क्रीडा प्रबोधिनी च्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

WhatsApp Image 2021 11 15 at 2.22.15 PM 2 1

सौ सुमेधा बेडेकर यांनी गायलेलेया राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सौ साधना जोशी यांनी या कार्यक्रमाचे सुत्रासंचालन केले.

१५.११.२०२१

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत