जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय झाडांची लागवड करा! वृक्षमित्र पुरूषोत्तम रायजाधव यांचे आवाहन.

जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय झाडांची लागवड करा! वृक्षमित्र पुरूषोत्तम रायजाधव यांचे आवाहन.

plant tress for the more oxygen

     ठाणे - ता. २१ 

    "कोरोनाच्या काळात प्रत्येकाला ऑक्सीजचे महत्व प्रत्येकाला कळले आहे. परदेशी झाडांपेक्षा भारतीय झाडे जास्त ऑक्सीजन जास्त देतात. म्हणून भारतीय झाडे लावण्या संकल्प आम्ही केला आहे". असे उदगार ह.भ.प. पुरुषोत्तम रायजाधव यांनी काढले.खारघर जवळील  पांडवकड्याजवळील अनेक झाडे जोमाने वाढत आहेत. विश्वात्मके देवे मंडळींचे सातत्यपूर्ण निसर्ग संवर्धन अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
    कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन विश्वात्मके देवे साधक मंडळींनी पुण्यातील, बोपदेव घाट येवलेवाडी, येथे पांडूरंगाच्या नामघोषात, भक्तीभावाने पाचशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करुन आपले सातत्य कायम राखले. यात केवळ भारतीय झाडांचा समावेश आहे कारण भारतीय असणारी पिंपळ, वड, कडूनिंब, जांभूळ, पिंपळ, पळस, ही झाडे इतर अभारतीय झाडांपेक्षा जास्त ऑक्सीजन देतात आणि त्याचबरोबर औषधी गुणांनी युक्त आहेत. या मंडळींनी जाणलं आहे कि या विश्वाला ऑक्सीजनची गरज नितांत भासत राहणार आहे कारण माणूस काँक्रीटचे जंगल वाढवण्यासाठी नैसर्गिक जंगलांला अमर्याद हानी पोहोचवत आहे. ऑक्सीजनचे स्त्रोत असणाऱ्या आणि फुकट ऑक्सीजन देणाऱ्या या भारतीय वृक्षांची लागवड आणि जतन करायला कोणी मागत नाही. विश्वात्मके देवे साधक मंडळीं गुरुवर्य हभप पुरुषोत्तम रायजाधव सर यांच्या देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती या मार्गदर्शनाने, हे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे कार्य मलाच करायचं आहे या निश्चयाने बरीच मंडळी या कार्यात हिरीरीने सामील होत आहेत. आज बोपदेव घाट पुणे येथेसुद्धा चिखली-निपाणी कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, नवी मुंबई आळंदी परीसरातून मंडळी जमा झाली आणि बघता बघता पाचशे झाडे लावायचे आपले टार्गेट पूर्ण केले.

लहान मुले, महिला आणि पुरुष या सर्वांनी सहभागी होऊन कार्य पूर्णत्वाला नेले. ‘फोटो इज मोटो ‘या वृत्तीने झाडं लावली जातात, यात रोप, खड्डे आणि कष्ट वाया जातात म्हणून अशा मंडळींना नंतर ती झाडं वाढून जगवली पाहीजेत या दुरदृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहीजे अशी कळकळ रायजाधव सरांनी व्यक्त केली. “नगरेची रचावी। जलाशवे निर्मावी। महावने लावावी। नानाविधे।।” या ज्ञानेश्वर माऊलींच्या सुचनेचं तंतोतंत पालन करताना विश्वात्मके देवे मंडळी दिसतात. असं केलं तरच झाडं टिकतील, वाढतील आणि ऑक्सीजनचा स्त्रोत कायम राहील हे जाणून विश्वात्मके देवे मंडळींनी आतापर्यंत पंचवीस हजारांच्याच्या वर झाडे लावून त्यांचा सांभाळ करत आहेत. झाडे लावा झाडे जगवा हे ब्रिदवाक्य आपण ऐकतो पण ते अंमलात आणणारी ही मंडळी निश्चितच समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत. पूण्यातील, येवलेवाडीतले विद्यमान नगरसेवक श्री. अनिलसाहेब विठ्ठल येवले, श्री.विशालबापू कामठे, तसेच हभप निलेशभाऊ आणि गणेशभाऊ निंबाळकर यांच्या सहकार्यातून विश्वात्मके देवे मंडळींनी आज हा यज्ञ पुर्ण केला. समाजातील अशा सर्वांनी यात सामील झालं तर हे वैश्विक कार्य होऊन विश्वशांती निर्माण होईल. असा विश्वासही वृक्षमित्र पुरुषोत्तम रायजाधव सरांनी व्यक्त केला.

-शुभम पेडामकर

author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत