जालना : मनसेच्या दणक्यानंतर बागेश्वरी साखर कारखान्याचे श्री शिवाजी जाधव हे 6 जून पर्यंत कारखाना चालू ठेवणार – मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके

जालना : मनसेच्या दणक्यानंतर बागेश्वरी साखर कारखान्याचे श्री शिवाजी जाधव हे 6 जून पर्यंत कारखाना चालू ठेवणार – मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके

23 मे 2021 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब जालना यांना निवेदन देऊन निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या होत्या, बागेश्वरी साखर कारखाना पाऊस पडेपर्यंत चालू ठेवा अशी मागणी जिल्हाधिकारी जालना यांना करण्यात आली होती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची दखल घेत, मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बागेश्वरी साखर कारखाना 6 जून पर्यंत चालू राहणार, जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार, परंतु बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन, श्री. शिवाजी जाधव, श्री. अमित जाधव कार्यकारी संचालक यांनी 17 मे रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले होते ऊस तोड करून कारखान्यात आणून घाला 25 मे 2021 पर्यंत कारखाना चालू राहणार या निर्णयाच्या विरोधात आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 23 मे 2021 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब जालना यांना निवेदन देऊन, जिल्ह्यातील तालुका परतुर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्र परतूर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाची नोंद घेऊन,ऊस गाळप करून घेतला नाही,व फसवणूक केल्या प्रकरणी श्री शिवाजी जाधव यांच्यावर कारवाई करण्या यावी, जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात श्री‌.प्रकाश सोळंके म्हणाले, जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाची नोंद घेऊन ऊसाची गाळप केली नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कमी भावात इतर बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस दिला, बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

73b2312f 1fe9 47b4 9b64 7b848b8bf895

हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाची भरपाई बागेश्वरी साखर कारखान्याने द्यावी, बागेश्वरी साखर कारखाना,या भागातील शेतकऱ्याने भाग भांडवल दिले म्हणून उभा राहिला, जरी आज शिवाजी जाधव यांनी खरेदी करून घेतला असला तरी बागेश्वरी साखर कारखाना जनहितार्थ निर्माण झालेला आहे, हे विसरून चालणार नाही, तसेच बागेश्वरी साखर कारखाना 25 मे 2021 ला बंद होणार, असे पत्रक बागेश्वरी साखर कारखान्याने काढल्यामुळे बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी भयभीत झाले आहेत, बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन श्री,शिवाजी जाधव यांनी जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत बागेश्वरी साखर कारखाना चालू ठेवावा, अशा प्रकारे बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीर जाधव यांना आदेश देण्यात यावा जिल्हाधिकारी जालना यांनी तसा आदेश दिल्यानंतर बागेश्वरी साखर कारखाना 6 जून पर्यंत चालू राहणार, बागेश्वरीच्या या निर्णयासाठी धन्यवाद, परंतु बागेश्वरी साखर कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यायला हवे असा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे, परंतु त्या आदेशाचे उल्लंघन करत, आदेशाचा भंग केला, खरेतर कायद्यानुसार बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस गाळप बंधन कारक होते, परंतु परभणी, बीड, जिल्ह्यातून कमी भावाने म्हणजे 1700 ते 1800 रुपयांने स्वस्त भावाने उस मिळाल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उभा आहे, बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला, संबंधित कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव दिलेला आहे.

d575bee8 646f 4b64 bce5 bde083f7d906

तो फरक भाव बागेश्वरी साखर कारखान्यांनी द्यावा, बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील स उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस उभा आहे, त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बागेश्वरी साखर कारखाने 2600 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी नुकसान भरपाई देण्यात यावी व ऊसकऱ्यांना वेठीस धरून, प्रोग्राम लेट च्या नावाखाली उत्पादक शेतकऱ्यांवर आपला दबाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम शेतकऱ्यांना वेठीस धरल्या प्रकरणी शेतकऱ्यांचे नुकसान करणारे,श्री, शिवाजी जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच 2021 ते 20 22 या हंगामासाठी जर परतूर मंठा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस बागेश्वरी साखर कारखाना, प्रोग्राम प्रमाणे गाळप करणार नसेल तर या बागेश्वरी साखर कारखान्याला गाळप करण्याची परवानगी देऊ नये, मा.जिल्हाधिकारी साहेब जालना,यांनी अशी शिफारस मा.साखर आयुक्त पुणे यांना करावी,तसेच,बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.शिवाजी जाधव यांच्यावर इतर ऊस गाळपाचे अटी व नियम भंग.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत