जालना : बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे हाल-अपेष्टा केल्या,श्री जाधव यांच्यावर कारवाई करा- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके

जालना : बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे हाल-अपेष्टा केल्या,श्री जाधव यांच्यावर कारवाई करा- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके

ते पुढे म्हणाले की, यावर्षी ऊस तोड करण्यासाठी एक एकर ऊस तोडण्यासाठी, 8 ते 10 हाजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, हे पैसे ऊसतोड मुकादम टोळी मार्फत ऊस पुरवठा अधिकारी,व ऊस पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत, चेअरमन अशी ही साखळी आहे, ऊस तोड करण्यासाठी कोणाकडून पैसे घेतले याचे उत्तम उदाहरण : मापेगाव खुर्द येथील, श्री. लक्ष्मण शेंडगे 4 एकर ऊस तोडण्यासाठी 44 हाजार, श्री. उद्धव काकडे 2 एकर ऊस तोडण्यासाठी 35 हजार, श्री,पप्पु काकडे 3 एकर ऊस तोडण्यासाठी 46 हजार, या 1 मापेगाव गावातील 3 शेतकऱ्याकडून एक लाखा रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा केले,तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परतूर मंठा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांकडून किती कोटी जमा झाले असतील, आणि हे पैसे कोणासाठी जमा केले, कशासाठी पैसे घेतले, अशी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होते, म्हणून जिल्ह्यातील तालुका परतुर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्र परतूर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाची नोंद घेऊन,ऊस गाळप करून घेतला नाही,व फसवणूक केल्या प्रकरणी श्री शिवाजी जाधव यांच्यावर कारवाई करण्या यावी, जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात श्री‌.सोळंके म्हणाले, आपले लक्ष वेधू इच्छितो की, जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाची नोंद घेऊन ऊसाची गाळप केली नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कमी भावात इतर बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस दिला, बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

2144a310 e9e2 4e4c 87e4 7d28cbd2f6a9

हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाची भरपाई बागेश्वरी साखर कारखान्याने द्यावी, बागेश्वरी साखर कारखाना,या भागातील शेतकऱ्याने भाग भांडवल दिले म्हणून उभा राहिला, जरी आज शिवाजी जाधव यांनी खरेदी करून घेतला असला तरी बागेश्वरी साखर कारखाना जनहितार्थ निर्माण झालेला आहे, हे विसरून चालणार नाही, तसेच बागेश्वरी साखर कारखाना 25 मे 2021 ला बंद होणार, असे पत्रक बागेश्वरी साखर कारखान्याने काढल्यामुळे बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी भयभीत झाले आहेत, बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन श्री,शिवाजी जाधव यांनी जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत कारखाना चालू ठेवावा, अशा प्रकारे बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीर जाधव यांना आदेश देऊन,तसेच बागेश्वरी साखर कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यायला हवे असा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे, परंतु त्या आदेशाचे उल्लंघन करत, आदेशाचा भंग केला, खरेतर कायद्यानुसार बागेश्वरी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस गाळप बंधन कारक होते, परंतु परभणी, बीड, जिल्ह्यातून कमी भावाने म्हणजे 1700 ते 1800 रुपयांने स्वस्त भावाने उस मिळाल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उभा आहे, बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला.

संबंधित कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव दिलेला आहे तो फरक भाव बागेश्वरी साखर कारखान्यांनी द्यावा, बागेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील स उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस उभा आहे, त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बागेश्वरी साखर कारखाने 2600 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, कारण महाराष्ट्र शासन,मा.साखर आयुक्त पुणे यांच्या आदेश आहे, प्राधान्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस अगोदर गाळप करण्यात यावा, असा आदेश असतानासुद्धा कारखान्याचे चेअरमन श्री.शिवाजी जाधव यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून, प्रोग्राम लेट च्या नावाखाली शेतकऱ्यांना आधार लटकून ठेवले,त्यांच्या ऊस वेळेत गाळप न करता बाहेर जिल्ह्यातून स्वस्त भावात ऊस मिळाल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस आज ही उभा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, व कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजी जाधव यांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, बागेश्वरी साखर कारखाने 2020/2021 हंगामा आष्टी, हादगाव, या गटातील शेतकऱ्यांना हेक्टरी 100 टन आवरेज आले व या दोन्ही गटातून मोठ्या प्रमाणात पाऊस गाळप केला या दोन्ही गटात ऊसाची प्रत्यक्षात लागवड कमी आहे परंतु कागदोपत्री बनवाबनवि करून बाहेर जिल्ह्यातून ऊस खरेदी करून तो उस या गटातील आहे, असे दाखवले, बागेश्वरी साखर कारखान्याने परतूर मंठा तालुक्यातील अनेक देवस्थानाच्या जमिनी हराशी च्या नावाखाली गोंधळ निर्माण करून अल्प मोबदला देऊन करारा करून घेतले ते करार रद्द झाले पाहिजे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून जनहितार्थ तत्काळ कारवाई होईल अशी अपेक्षा आहे,परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान झाले ते नुकसान भरपाई दिली पाहिजे.

96b59d8f 3eed 433a bd4c a55265aeffca

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आपला दबाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम शेतकऱ्यांना वेठीस धरल्या प्रकरणी शेतकऱ्यांचे नुकसान करणारे,श्री, शिवाजी जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच 2021 ते 20 22 या हंगामासाठी जर परतूर मंठा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस बागेश्वरी साखर कारखाना, प्रोग्राम प्रमाणे गाळप करणार नसेल तर या बागेश्वरी साखर कारखान्याला गाळप करण्याची परवानगी देऊ नये, मा. जिल्हाधिकारी साहेब जालना,यांनी अशी शिफारस मा.साखर आयुक्त पुणे यांना करावी,तसेच,बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.शिवाजी जाधव यांच्यावर योग्य ती तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहितार्थ परतूर मंठा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा नोंद घेऊन ऊस गाळप केला नाही, तसेच ऊस तोडण्यासाठी पैसे घेतले, व ज्या शेतकऱ्याने नाविलाजाने बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला, अशा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करीत याची नोंद घ्यावी शेवटी असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके यांनी दिला

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत