जागतिक संगीत दिनाबद्दल अनोखा कार्यक्रम

जागतिक संगीत दिनाबद्दल अनोखा कार्यक्रम

unique event about world music day

विराग वानखेडे करीत ४० फिट उंचीचे पुस्तक लिहून करीत आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

नवी मुंबई – विराग वानखेडे यांनी संगीताचे विविध अलंकार लिहून जगातील सर्वात मोठ्या उंचीचे पुस्तक बनवण्याचा संकल्प केला आहे. तब्ब्ल १७ लाख नवीन अलंकार बनवून ४० फिट उंचीचे पुस्तक तयार करण्याचे काम सध्या विराग वानखेडे करीत आहेत. जागतिक संगीत दिन (वर्ल्ड म्युसिक डे) निमित्त वैराग्य वानखेडे यांच्याकडून जगातील सर्व संगीतप्रेमींसाठी युट्युब माध्यमाद्वारे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जगातील सर्व संगीतप्रेमींनी आपले गाणे सादर केले असून विराग वानखेडे यांच्या या कामगिरीबद्दल अनेक दिगज्जांनी शुभेच्छा दिल्या.

२१ जून म्हणजेच वर्ल्ड म्युसिक डेनिमित्ताने युट्युबद्वारे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जगभरातील ४५ हुन अधिक गायकांनी सहभाग घेतला. युट्युबद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये ८ ते ७५ अशा सर्व वयोगटातील गायक आणि संगीतप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी सतीश मौक्षवंदम प्रमुख अतिथी होते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक अनुप लोटा आणि प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी देखील व्हिडिओद्वारे विराग वानखेडे यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संगीतप्रेमींसाठी आणि संगीताबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला.

इंजिनिअर विराग वानखेडे (मल्टीपल गिनीस रेकॉर्ड होल्डर, निर्माते- दिगदर्शक) यांनी १७ लाख अलंकार तयार करून त्याचे ४० फिट उंचीचे पुस्तक तयार केले आहे. २ लाख पाने असणाऱ्या या पुस्तकासाठी विराग वानखेडे यांना तब्ब्ल १५ लाखाहून अधिक खर्च आला आहे. हे पुस्तक पीडीएफ फॉर्म मध्ये तयार असून हे पुस्तक प्रत्यक्ष स्वरूपात निर्माण करण्याचे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे विराग वानखेडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संगीत ही एक कला आहे याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहू नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

संगीत एक साधना आहे, त्याकडे व्यवसायिकदृष्ट्या न पाहता जगण्याचा एक आनंद अशा दृष्टिकोनातून पहिले पाहिजे. संगीत क्षेत्रात कोणाला आपले करिअर करायचे असल्यास त्यासाठी त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. – विराग वानखेडे, (मल्टीपल गिनीस रेकॉर्ड होल्डर, निर्माते- दिगदर्शक)

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत