जय गिरनारी

जय गिरनारी

जय गिरनारी
लीला तुझी न्यारी
येई तुझ्या दरबारी
जेव्हा तू पुकारी….।।१।।

मनी असे ध्यास
तुझ्या भेटीची आस
देई तू आत्मविश्वास
तेव्हा होई पूर्ण प्रयास….।।२।।

शोधे नजर कडेकपारी
भेटे कुठे गिरनारी
सुचवी तू इशारी
मी आहे चराचरी….।।३।।

घालता तुला साद
लागता तुझा नाद
देई तू प्रतिसाद
तो ची भक्तांसी प्रसाद….।।४।।

वाचता तुझी महती
अन् गाता आरती
येई तव प्रचीती
जेव्हा येते तुझी अनुभुती….।।५।।

Girnar Parvat

विसरता भूक-तहान
हरपता देहभान
मिळे जगण्यासी अवसान
करता तुझे ध्यान….।।६।।

शमवी देहाच्या यातना
मनाच्या अवहेलना
होता तुझ्या दर्शना
पूर्ण होई अर्चना….।।७।।

आठवता तुझे रूप
मनाला येई हुरूप
दाखवी तुझे स्वरूप
होता तुझ्याशी एकरूप….।।८।।

होता तव आदेश
सूटती सारे पाश
षड्रिपु होती वश
मिळता तव आशिष…..।।९।।

पुनवेच्या राती गिरनारांस
असे चांदण्याची आरास
निलिमा म्हणे सदा पाव दास
जो धरी तुझी आस….।।१०।।

सौ. निलिमा वसंत वारके

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत