जम्मू-काश्मीरमध्ये मोदी सरकारचं ‘मिशन काश्मीर’

जम्मू-काश्मीरमध्ये मोदी सरकारचं ‘मिशन काश्मीर’

Modi government's 'Mission Kashmir' in Jammu and Kashmir

855638 modi

नवी दिल्ली :- नरेंद्र मोदी यांनी जम्मू -काश्मीरमधील नेत्यांची काल भेट घेतली. जम्मू काश्मीर मध्ये ऑगस्ट २०१९ कलाम ३७० रद्द करण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्यांनतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी तिथे जाऊन तेथील नेत्यांचे भेट घेतली. आणि त्यांच्याशी संवाद साधला. या भेटींनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून जम्मू काश्मीरच्या निवडणूका घेऊन राजकीय परिस्तिथी पूर्ववत करण्याचा मोदी सरकारचा प्रयन्त आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सडे तीन तासाच्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले- या बैठकीत १४ पक्ष्यांचे नेते उपस्थित होते. या वर्षाच्या डिसेंबर पासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होऊ शकतात. या कालावधीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड , आणि इतर काही राज्यात देखील निवडणूक होत आहेत. जम्मू काश्मीर मध्ये काही मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे ते देखील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता दिसून येते. हे कामे पूर्ण होताच जम्मू काश्मीर निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया सुरु करतील. जम्मू-काश्मीर विधानसभेतील मतदारसंघांची संख्या ८३ वरून ९० वर नेली जाऊ शकते. विधानसभेच्या २४ जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात. त्यामुळे त्या रिक्त असतात. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळणार का तसेच विधानसभेच्या जागा कितीनं वाढणार हे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत