छात्रभारतीचा प्ले अँड शाईन उपक्रम: रात्रशाळेच्या १०० विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे किट वाटप

छात्रभारतीचा प्ले अँड शाईन उपक्रम: रात्रशाळेच्या १०० विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे किट वाटप

मुंबई : रात्रशाळेतील १०० विद्यार्थ्यांना १०/१५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्याचे किट प्ले अँड शाईन व मुंबई छात्रभारतीच्या वतीने आज मुंबईभर वाटण्यात आले.

9de6a617 ccba 4680 b3ec 01f78d954f66

कोरोनामुळे दिवसा काम करुन रात्री शाळेत शिकणाऱ्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. घरातील हलाखीची परिस्थिती त्यात रोजगार गेलेत त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीच्या प्रसंगी मदतीचा हात म्हणून प्ले अँड शाईन संस्थेच्या सौजन्याने आज मुंबईभर १०० रात्रशाळेतील मुलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत घरातील आर्थिक डोलारा सांभाळत कुठे दुध टाक,पेपर टाक, मास्क विक अशी पडेल ती कामे करुन शिकण्याची जिद्द ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे. पुढेही छात्रभारती व प्ले अँड शाईन संस्था या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुंबईभर काम करणार आहे असे प्ले अॕन्ड शाईनचे अध्यक्ष सार्थक वाणी यांनी सांगितले.

ec06b09c 72a2 4ace a7fb 465a9225b3c2

यावेळी जयवंत पाटील, अगस्ती लावंड, चंद्रकांत म्हात्रे, छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले, सचिन काकड, विकास पटेकर, दिपाली आंब्रे, अनिकेत उडदे, निलेश झेंडे हे उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत