“छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात,महाराष्ट्र,त्यांच्या घरात त्यांचं अन्न आपण खातो म्हणून अन्याया विरोधात लढायला शिका”- प्रकाश सोळंके

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात,महाराष्ट्र,त्यांच्या घरात त्यांचं अन्न आपण खातो म्हणून अन्याया विरोधात लढायला शिका”- प्रकाश सोळंके

"Learn to fight injustice because we eat their food in Chhatrapati Shivaji Maharaj's country, Maharashtra, his house" - Prakash Solanke

-प्रतिनिधी,आष्टी परतुर

संकनपूरी शाखा उद्घाटन प्रसंगी बोलतांनी ते म्हणाले की मनसे श्रीमान राज ठाकरे यांनी आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत असे प्रकाश सोळंके यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी लाथ बसली पाहिजे. परतूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व दिशाहीन झाले. आपण विश्वासाने निवडून निवडून दिलेला नेतृत्व विशेष काही व्यापारी गुत्तेदार या लोकांसाठी काम करीत असलेले चित्र स्पष्ट झाले आहे, त्यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले शेतकऱ्याच्या कुठल्याच प्रश्नाबाबत हे नेतृत्व बोलतानी दिसत नाही.

WhatsApp Image 2021 07 11 at 6.18.18 PM

यासाठी परतूर मंठा तालुक्यात अनेक गंभीर प्रश्न शेतकरी जनतेसमोर आहेत, भेसळयुक्त बी-बियाणे, उसाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की ऊस तोडी साठी आपल्या गावातील एकही रुपया ऊस तोडणाऱ्या लोकांना द्यायचा नाही, तोड चिक्की साठी सुद्धा हे कृपया द्यायचा नाही, आपल्या बागेश्वरी साखर कारखान्यासह आपल्या जिल्ह्यातील कुठल्याही कारखान्याने कोणत्याही प्रकारचे शेअर्स मागितले तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा आणि त्या वरती निश्चित कारवाई केल्याशिवाय राहणार,संकनपूरी परिसरातील रस्त्याबाबत हे त्यांनी जनतेसमोर विषय मांडत रस्ता होतानीच गावकऱ्यांनी का विरोध केला नाही. असा प्रतिप्रश्न गावकऱ्यांना त्यांनी उपस्थित केला. बोलत असताना ते म्हणाले की तुमच्या गावाला जोडणारे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्याची चौकशी होणार संबंधित गुत्तेदार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांवर व क्वालिटी कंट्रोल च्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार.आज दिनांक 11 जुलै 20 21 रोजी संकनपुरी तालुका परतुर जिल्हा जालना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाचे उद्घाटन प्रकाश बापु सोळंके.मनसे जिल्हाध्यक्ष जालना हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटन प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष परतुर.कृष्णा गोवर्धन सोळंके. रामजी नवल मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष परतुर. आत्माराम जगताप मनसे शेतकरी सेना उपतालुका अध्यक्ष परतुर. माऊली सुरासे. महाराष्ट्र नवनिर्माण शाखा संकनपुरी कार्यकारणी.या शाखा उद्घाटन प्रसंगी नियुक्तीपत्र देऊन संकनपूरी शाखा अध्यक्ष.श्री तुकाराम सुपेकर. उपाध्यक्ष बाळासाहेब भालेकर. सचिव शिवाजी सुपेकर.सह सचिव.परलाद टेकाळे.शाखा संघटक. माहादेव टेकाळे. सदस्य.विकाश प्रधान. भास्कर सुपेकर. हनुमान बेरसले. गजानन बहीरे. साळीकराम नवघरे, गावातील शेतकरी महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत