छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला; २२ जवानांचे बलिदान

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला; २२ जवानांचे बलिदान

छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले. यातील काही जवानांचे मृतदेह हाती आले आहेत. बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरलं होतं या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले.

नक्षलवादी हल्ल्यात ३२ जवान जखमी २२ जवान शहीद तर एक जवान बेपत्ता झाले आहेत. 400 माओवाद्यांनी तिन्ही बाजूंनी घेरून मशीन गन ने हल्ला केला होता. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शुक्रवारी रात्री कोब्रा कमांडो, डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड, CRPF बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली आणि जवळपास १००० कमांडो यांनी मिळून ऑपरेशन केलं होत.१० दिवसामध्ये नक्षलवाद्याचा हा दुसरा हल्ला आहे. पण नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर गोळीबार केला. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली. यासोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नक्षलवाद्यांना गंभीर इशाराही दिला.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत