चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर

चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर
best hairstyle for women after the age of forty FB 1

हेअरस्टाईलचा तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. हेअरकटमुळे बऱ्याचला लुक बदल्यावर तुम्हाला लोकांकडून चांगल्या कंमेट्सही मिळतात. हेअरस्टाईल ही नेहमी तुमच्या फेसशेपप्रमाणे असायला हवी. चाळीशीनंतरही तरूण दिसण्यासाठी काही हेअरस्टाईल तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. ज्यामुळे तुमचं वाढणारं वय झाकलं जाईल आणि तुम्ही पंचविशीतल्या तरूणीसारख्या दिसाल.

चाळीशीनंतर कशी असावी हेअरस्टाईल

तुम्हाला वाचून थोडं आश्चर्य वाटेल कारण आम्ही तुम्हाला फ्रिंज अथवा थोड्या कमी उंचीच्या हेअरस्टाईलचा सल्ला देणार आहोत. कारण यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्युम वाढलेला दिसेल. चाळीशीनंतर वय, हॉर्मोन्स, औषधे, चिंताकाळजी यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे तुमचे केस थोडे पातळ झालेले असतात. अशावेळी चेहऱ्यावर फ्रिंज आल्यामुळे तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसाल. तुम्ही हेअरस्टाईसोबत काही प्रमाणात हेअर एक्सेंटेशनचा पर्यायही निवडू शकता. त्याचप्रमाणे केसांना नियमित तेल मालिश, शॅम्पू आणि कंडिशनर करा. 

शोल्डर लेंथ हेअरस्टाईल

जर तुम्हाला फार लहान केस ठेवणं आवडत नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या केसांची उंची तुमच्या खांद्याएवढी नक्कीच ठेवू शकता. या उंचीचे अनेक हेअरकट तुम्हाला हेअर स्टायलिस्ट सजेस्ट करू शकतात. विशेष म्हणजे असा हेअरकट कलर अथवा हायलाईट केल्यावर खूपच छान दिसतो. चाळीशीनंतरच्या महिलांवर हा हेअर कट शोभून दिसतो आणि त्यामुळे त्या वयस्करही दिसत नाहीत. 

13707078 1809293642648196 1235551264 n 1

चिन लेंथ बॉब कट हेअरस्टाईल

जर तुमचं वय चाळीशीच्या पुढे गेलं असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण फोर्टी प्लस महिलांसाठी हा एक उत्तम हेअरकट आहे. तुमच्या हनुवटीच्या उंचीचा बॉब कट केल्यामुळे तुम्ही वयाने खूप लहान दिसाल. हवं तर अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही  तुमच्या स्किन टोननुसार हेअर कलर अथवा केस हायलाईट करू शकता. आजकाल सिल्व्हर कलरची फॅशन आहे. त्यामुळे तुमचे पांढरे झालेले केसही झाकले जातील. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर तारूण्याची झलकही दिसेल. 

131057196 218077719847850 1592467992083974095 n 1

कॉलरबोन लेंथ हेअरस्टाईल

मानेपर्यंत उंची ठेवून तुम्ही तुमच्या केसांची हेअरस्टाईल केली तर तुमचं वय चाळीशीतही कमी दिसेल. अशा हेअरस्टाईलला साईड पार्टिशन खूप छान दिसतं. शिवाय यामुळे तुमचा लुकही मस्त दिसेल. थोडासा आणखी बदल करण्यासाठी तु्म्ही तुमचे फक्त पांढरे झालेले केस हायलाईट करून लपवू शकता. शिवाय अशा हेअरस्टाईलवर हायलाईट केल्यावर तुम्हाला एक वायब्रंट लुक मिळू शकतो.

13259001 1738632319750212 1737971304 n
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत