‘चला करूया संरक्षकांच्या आरोग्याचे संरक्षण’ त्यांना योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन

‘चला करूया संरक्षकांच्या आरोग्याचे संरक्षण’ त्यांना योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन

‘Let’s protect the health of protectors’ by giving them proper preventive health information

मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग मुंबई पोलीस यांच्या नेतृत्त्वाखाली दिनांक २३ जुलै २०२१ रोजी झूम ऑनलाईन च्या माध्यमातून मुंबई पोलीस विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या एकात्मिक संलग्नतेने मध्य प्रादेशिक पोलीस विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, एकूण २० पोलीस स्टेशन मधिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आरोग्य आणि तंबाखूमुक्त पोलीस स्टेशन वेबिणार सफलतापूर्वक संपन्न झाला.

WhatsApp Image 2021 07 23 at 10.13.30 PM

सदर वेबीनारदरम्यान डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण सर यांनी वेबीनारची प्रस्तावना करत आपल्या मध्य विभागातील पोलिसांचे आरोग्य चागले राहण्यासाठी तंबाखू मुक्त पोलिस स्टेशन करण्याचे आव्हाहन केले जेणेकरून आपल्या पोलिसांचे आरोग्य चांगले राहील तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक मदत होईल. कोरोना काळात तंबाखू सेवनाने धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो, तसेच तंबाखू सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात इत्यादी बद्दल ची माहिती मा. अर्जुन सिंग, सर्जिकल ओंकॉलॉजिस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन आपले कार्यस्थळ इत्यादी बद्दल ची माहिती मा. नारायण लाड, असिस्टंट जनरल मॅनेजर, सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच सदर सभेदरम्यान एकूण २० पोलीस स्टेशन मधील ४१ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


येणाऱ्या काळात आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन बाबत जनजागृतीपर ऑनलाईनच्या माध्यमातून मध्य प्रादेशिक पोलीस विभागातील २० पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जेणेकरून आपले पोलीस अधिकारी तंबाखू सारख्या व्यसनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहिल्यामुळे आपला समाज हा सुदृढ बनेल…

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत