Egg Curry | चमचमीत अंडा करी

Egg Curry | चमचमीत अंडा करी

tasty egg curry

लागणारे साहित्य – दोन अंडी उकळलेले, उकळलेले दोन बटाटे, अर्धा चमचा जिरे, दोन तेज पान, दोन लाल मिरच्या, चार लवंग, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले दोन कांदे, किसलेले दोन टोमॅटो, एक चमचा आलं-लसूण पेस्ट

मसाला – अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पूड, एक चमचा लाल मिरची पूड, एक चमचा गरम मसाला, एक चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचा देशी तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू, एक चमचा खसखस, एक चमचा तीळ हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.

कृती – अंड्याचा वरील भागात चाकूने क्रॉस करून घ्या. बटाटे दोन भागात कापून घ्या. कढईत तेल गरम करून बटाटे हलक्या रंग येईपर्यंत तळून घ्या. आता फोडणीसाठी वेगळे तेल गरम करून कांदा टाका आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळा. नंतर टोमॅटो, आले-लसूण पेस्ट टाका, लाल मिरची, गरम मसाला टाका आणि मसाला तेल सोडेपर्यंत शेका. काजूचे पेस्ट टाकून हालवा आणि एक कप पाणी टाका. आता बटाटे आणि अंडे टाकून पाच मिनिटे झाकून ठेवा. नंतर उतरवून घ्या. कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत