चक्रीवादळ YAASS मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला इशारा

चक्रीवादळ YAASS मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला इशारा

मुंबई : आणखी एक चक्रीवादळ येत्या 24 तासात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ मोठ्या भयंकर वादळात रुपांतरीत होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदल आणि वायु सेनेकडून अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. या चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाचे (IMD)राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून (NWFC)सांगण्यात आले की, यास (YAAS) उत्तर-वायव्येकडे जात असताना, सोमवारी पहाटे ते चक्रीवादळ वादळामध्ये रूपांतरित होईल आणि येत्या 24 तासांत ते उग्ररुप धारण करु शकते. चक्रीवादळ तीव्र वादळात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उपग्रह आणि समुद्राच्या गतीशीलतेच्या सहाय्याने घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर यावर भाष्य करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत