चकलांबा गावात रस्ता पाणी वीज कमी पडू देणार नाही सरपंच सुरेशलाल जाजु

चकलांबा गावात रस्ता पाणी वीज कमी पडू देणार नाही सरपंच सुरेशलाल जाजु
WhatsApp Image 2021 07 07 at 9.59.41 PM 1

गावात सिमेंट रस्ता पिवर ब्लॉक पथदिवे गाव केले टकाटक

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात जनतेतून निवडून आलेले सरपंच सुरेश लाल मुरलीधर जाजु यांनी प्युर ब्लॉक पथदिवे सिमेंट रस्ता पाणी विहीर ,नदी खोलीकरण यासह विविध विकास कामे केली असून येणाऱ्या काळामध्ये चकलांबा गाव व वाडी वस्ती तांड्यावर रस्ता पाणी वीज व इतर मूलभूत गरजा कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन सरपंच सुरेश लाल जाजू यांनी पत्रकारांशी बोलतांना केले आहे

गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात ज्येष्ठ सरपंच सुरेश लाल मुरलीधर जाजु यांनी सिमेंट रस्ते नाली पिवर ब्लॉक पथदिवे गाव लगत नदी खोलीकरण रस्ते यासह शाळेला कंपाउंड वॉल पिवर ब्लॉक तांडा वस्ती वर पाणी रस्ते लाईट आधी कामे केली आहेतअंडर ग्राउड पाईपलाईन , फवारणी यंत्र घेतले घंटागाडी घेतले, पाणी फिल्टर, नाली स्वच्छता यासह सिमेंट रस्ते अंगणवाडी डिजिटल, शाळा डिजिटल ,जनरेटर घेतले, रोजगार हमी तीन बंधारे वृक्ष लागवड सोच खड्डे मंजुरी ग्रामपंचायत दुरुस्ती नवीन फर्निचर यासह विविध काम केले आहेत आणि येणाऱ्या काळात ते करणार आहे असे प्रतिपादन सरपंच सुरेश लाल जाजू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले असून चकलांबा गावांमध्ये मोठी बाजारपेठ आहे बाजारपेठेमध्ये बाजार वाट्टे स्वच्छता वीज पाणी या गावातील नागरिकांना रमाई घरकुल पंतप्रधान घरकुल योजना, सर्व शासकीय निमशासकीय योजना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सुरेश लाल जाजू यांनी सांगितले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत