घरीच वाढवा रोगप्रतिकारक शक्ती;आयुष मंत्रालयाने दिल्या टीप्स

घरीच वाढवा रोगप्रतिकारक शक्ती;आयुष मंत्रालयाने दिल्या टीप्स

गेल्या वर्षभरापासून प्रत्येक जण कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. मात्र, अद्यापही त्याचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठी उलथापालथ झाली आहे. असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सध्या प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सोबतच प्रत्येकाला रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढवण्यावर भर देण्याचं आवाहन करत आहेत. त्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आयुष मंत्रालयाने ट्विट करत आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याविषयी मार्गदर्शन केलं आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज च्यवनप्राश खा.

२. दिवसातून दोन वेळा हळद मिश्रित दूधाचं सेवन करावं.

३. तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं आणि मणुका यांच्यापासून तयार केलेला हर्बल टी किंवा काढा घ्यावा. हा काढा दिवसातून एकदा प्यावा.

४. दररोज कोमट पाणी प्या. तसंच कोमट पाण्यात चिमूटभर हळद व मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा.

५. बाहेरील पदार्थ टाळा व जास्तीत जास्त सकस आहाराचं सेवन करा.

६. स्वयंपाकात हळद, जीरा, लसूण, आलं आणि धणे यांचा वापर करा.

७. नियमित योग करा.

८. योग करतांना प्राणायम, अनुलोम-विलोम, दीर्घश्वास करावा.

कोरडा खोकला झाल्यास ‘हे’ उपाय करा.

१. कोरडा खोकला झाल्यास पुदिन्याची पानं व ओवा यांची वाफ घ्यावी.

२. गुळ किंवा मध घेऊन त्यात चिमुटभर लवंग पावडर मिक्स करा. त्यानंतर हे चाटण दिवसातून २-३ वेळा घ्या.

३. एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल घेऊन ते संपूर्ण तोंडामध्ये घोळू घ्या. त्यानंतर ते थुंकून टाका. व कोमट पाण्याने गुळण्या करा. परंतु, हे तेल गिळू नये.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत