गोव्याच्या ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहीम

गोव्याच्या ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहीम

Vaccination Awareness Campaign in Rural Goa

WhatsApp Image 2021 06 22 at 10.08.03 PM

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवातर्फे राज्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाबद्दल जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. अभाविप गोवाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सद्य:स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण व त्याचे महत्त्व याबद्दल शिक्षित करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कार्यकर्त्यांनी म्हापसा मधील धनगरवाडा,थिवीम ,कोळवले गावात तसेच जवळच्या वस्त्यांवर जाऊन तेथील नागरिकांना वैद्यकीय मदत घेण्याचे आणि लसीकरण करण्याचे महत्त्व सांगितले. विषाणूचा पराभव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी थर्मल गन वापरून या भागातील आजारी व वृद्ध नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिमीटर वापरून ऑक्सिजन पातळी तपासली. या ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी लसीकरणाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

WhatsApp Image 2021 06 22 at 10.08.02 PM

याबद्दलची अधिक माहिती देताना उत्तर गोवा जिल्हा सहसंयोजक अवधूत कोटकर यांनी सांगितले, “ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या मनात अजूनही कोविड लसीकरणाबद्दलचे खूप गैरसमज आहेत व त्यामुळे ते लसीकरण करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. अशावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोव्याच्या विद्यार्थ्यांनी ठरवले की, आम्ही ग्रामीण भागात जाऊन कोविड लसीकरणाबद्दल जनजागृती करू आणि त्यांचे गैरसमज दूर करून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य करू. अभाविपची ही मोहीम आम्ही राज्यातील विविध ग्रामीण भागांत सातत्याने जाऊन राबवित आहोत.”

या मोहिमेदरम्यान अभाविप उत्तर गोवा सहसंयोजक अवधूत कोटकर, अभाविप म्हापसा शहर शाखा मंत्री सुदिप नाईक, अभाविप म्हापसा शहर शाखा सहमंत्री सहिल महाजन, अभाविप म्हापसा शहर कार्यकरणी सदस्य आकाश नाईक व सोनिया वेंगुर्लेकर यांनी ही जनजागृती केली.
संपूर्ण गोवा राज्यात ” रिचींग द अनरीच” ही मोहीम अभाविप गोवा राबवत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत