गोड पदार्थ खाताय ? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

गोड पदार्थ खाताय ? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

major disease can occured by sweet dishes

काहींना जास्त गोड पदार्थ खाण्याची आवड असते. मिठाई, आईसक्रीम, जेवणातील रोजचे गोड पदार्थ आपल्या रोजच्या खाण्यात येतात. मात्र जर तुम्ही खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर सावधान व्हा. गोड खाणे आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतात. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे आजार होण्याची शक्यता असते :

लठ्ठपणा हा सर्वात सामान्य वाटत असला तरी हे बर्‍याच रोगांचे मूळ देखील आहे. जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपल्या शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे शरीरावर चरबी जमा होते आणि आपल्यात लठ्ठपणा वाढतो. याचा हृदयावर परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता असते. साखर जास्त प्रमाणात घेतल्याने याचा थेट परिणाम आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर होतो आणि प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार उद्भवतात. साखरेत कॅलरीच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही पोषक घटक नसतात. जे आपल्या शरीरात ऊर्जा वाढविण्यास काही मदत करतील.आपण साखरेचे प्रमाण जास्त घेतल्यावर काही वेळातच ऊर्जेची कमतरता आणि आळशीपणा जाणवतो.जर ही स्थिती दीर्घकाळापर्यंत राहिली तर हे घातक ठरू शकते.

07 kheer recipes

जास्त प्रमाणात साखर घेतल्याने आपल्या लिव्हरचे काम वाढते.आणि शरीरात लिपिडचे निर्माण जास्त होते.अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर रोगासारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात साखर घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. जी मेंदूसाठी नुकसानदायक आहे.या परिस्थितीत मेंदू पर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही आणि मेंदू व्यवस्थितरित्या काम करत नाही. यामुळे स्मृतीभंश देखील होऊ शकतो. वेळेच्या पूर्वी वृद्ध होणे देखील साखरेचे प्रमाण जास्त घेतल्याचे दुष्परिणाम आहेत.जेव्हा आपण साखर जास्त खातो तर ही साखर शरीरात जाऊन इंफ्लेमेट्री प्रभाव करते या मुळे त्वचेवर पुरळ होणं,वृद्धत्त्व,आणि सुरकुत्या होणे सारखे त्रास उद्भवतात.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत