गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायतचा ‘स्तुत्य उपक्रम’

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायतचा ‘स्तुत्य उपक्रम’

Commendable initiative of Chavanwadi Gram Panchayat

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच महाराष्ट्राचे उद्योजक गहिनीनाथ अण्णा गर्जे यांच्या कडून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी बीड येथील वामनभाऊ कार्यालयात नेत्र तपासणी शिबीर संपन्न करण्यात आले व तसेच चव्हाण वाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त फराळ व सांप्रदायिक कार्यक्रम करण्यात आले

WhatsApp Image 2021 07 20 at 5.47.27 PM 1

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायत उपसरपंच उद्योजक गहिनीनाथ अण्णा गर्जे कुटुंब नेहमीच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात योगदान देत असून संत वामन भाऊ संत भगवान बाबा यांच्या प्रेरणेने व महादेव महाराज बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर गर्जे कुटुंबीयांनी आषाढी एकादशीनिमित्त भावीक भक्तांना आरोग्य सेवा देण्याचा संकल्प केलेला आहे यावर्षी कोराणाच्या परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करत प्रितम भैय्या गर्जे मित्र मंडळाच्या माध्यमातून युवा नेते प्रितम भैय्या गर्जे यांनी स्वखर्चातून 40 महिला पुरुष नागरिकांना बीड येथील संत वामनभाऊ कार्यालयात नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते रुग्णांना नगर येथील आनंद ऋषी नेत्र रुग्णालयात ऑपरेशन करण्यात येणार आहे ,चव्हाण वाडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात सोशल डिस्टेंस ठेवून हरिनामाचा गजर करत भाविक भक्तांचे स्वागत करून फराळाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला मा चव्हाणवाडी चे ग्रामपंचायत उपसरपंच तथा उद्योजक गहिनीनाथ अण्णा गर्जे, युवा नेते प्रीतम भैया गर्जे, प्रितेश भैय्या गर्जे, सरपंच संतोष हातागळे, अशोक आघाव ,रमेश खोपडे, भुजंग शेळके, व तलवाडा भजनी मंडळ आणी चव्हाणवाडी भजनी मंडळ आदींनी परिश्रम घेतले आहे तलवाडा ते चव्हाणवाडी पायी दिंडी सोहळा संपन्न झाले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत