गुरूपौर्णिमा स्पेशल : प्रसादाचा शिरा

गुरूपौर्णिमा स्पेशल :  प्रसादाचा शिरा

Gurupournima Special: Vein of Prasada

rava shira

शिऱ्यातला रवा कधी कच्चा राहतो, तर कधी खूपच पाणी पडून अगदीच गिळगिळीत होतो. कधी साखर खूपच पडते,म्हणूनच तर नैवेद्याचा शिरा नेमका हुकतेय कुठे हे तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या…

साहित्य
एक वाटी बारीक रवा, तेवढीच वाटी भरून साखर , पाऊण वाटी साजूक तूप, २ वाटी गरम दूध, १ वाटी कोमट पाणी, १/४ टीस्पून विलायची पावडर, बदाम, मनुके, काजू यांचे बारीक काप १/४ वाटी, केसर.

कसा करायचा नैवेद्याचा शिरा ?
सगळ्यात आधी तर कढई किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यामध्ये तूप घालावे.
तूप चांगले गरम झाल्यावर त्यात रवा टाकावा आणि खमंग परतून घ्यावा. रव्याचा रंग बदलून तो जरा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतू द्यावा. कारण रवा चांगला परतला गेला नाही, तर शिरा अगदीच बेचव लागतो आणि दिसायलाही पांढराफटक दिसतो.

यानंतर रवा परतून झाला आणि रव्याचा रंग बदलला की त्यामध्ये दूध आणि पाणी हळूहळू टाकावे. दूध आणि पाणी एकदम ओतू नये. यामुळे शिऱ्यामध्ये गाठी तयार होतात. दूध आणि पाणी टाकताना मिश्रण चमच्याने सारखे गोलाकार ढवळत रहावे.

यानंतर आता हळूहळू कढईतला शिरा आळून येण्यास सुरूवात होईल. शिरा आळून आला की मग त्यात साखर, केसराच्या ५ ते ६ काड्या आणि विलायची पावडर घालावी आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण नीट हलवावे. यानंतर कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यावर गॅस बंद करावा आणि त्यानंतर शिऱ्यावर सुकामेवा टाकावा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत