गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

महिला हक्क आणि महिला प्रश्नांसाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाने देशभरातील गरोदर महिलांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. महिला आयोगाने गरोदर महिलांसाठी एक व्हाॅट्सॲप क्रमांक सुरू केला आहे. ज्या गरोदर महिलांना आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे त्या या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

देशात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. देशात दिवसागणिक लाखो रूग्ण कोरोनाच्या कचाट्यात अडकत आहेत. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर या परिस्थितीने चांगलाच ताण पडत आहे. याचा फटका इतर गरजवंताना पडू नये यासाठी पूरी खबरदारी घेतली जात आहे. अशातच गरोदर महिलांची काळजी वाटून महिला आयोगाकडून पाऊले उचलली गेली आहेत.

गरोदर असणाऱ्या महिलांना वैद्यकीय सेवेसाठी महिला आयोगाच्या एका विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे. ९३५४९५४२२४ या व्हाॅट्सॲप क्रमांकावर घरोदर महिला संपर्क करू शकतात. त्यानंतर त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाची ही सेवा दररोज २४ तास उपलब्ध असणार आहे. या सोबतच [email protected] या ईमेलद्वारेही महिला आयोगाशी संपर्क साधता येणार आहे. महिला आयोगाच्या या उपक्रमामुळे देशभरातील गरोदर महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत