गणपती बाप्पा मोरया…

गणपती बाप्पा मोरया…

वकर्तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकार्येंशू सर्वदा….

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणरायाला वंदन करूनच केली जाते. गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद शुल्क चतुर्थीला साजरा केला जातो. आज प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन होते. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे सुख, शांती, समाधान लाभते. श्री. गणपतीचे आवडीचे पदार्थ मोदक आणि लाडू हे होते. म्हणून 21 मोदक किंवा लाडू या गणराया समोर ठेवतात. तसेच प्रत्येकाला प्रसाद म्हणून शेवबुंदी, फळे, तीळगूळ, गोड फुटाणे इत्यादी प्रसाद म्हणून देतात.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून ते भाद्रपद मध्ये अनंत चतुर्थी पर्यंत मांसाहार करत नाही. दहा दिवस गणरायाची पूजा करून ही मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. गणरायाची ही मूर्ती काहींच्या घरी दीड दिवसाची, काहींच्या घरी पाच, काहिकडे सात तर काहिकडे दहा दिवसाची असते. सगळ्यांच्या घरी सुखमय अशा वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना करून सगळीकडे आनंदी आनंद साजरा केला जातो. दहा दिवसाचा हा पाहुणा अकराव्या दिवशी विसर्जित करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येक जण त्याच्याकडे विनवणी करत असतो.

वर्धन ईश्वर ताथवडे, ७वी
साधना मराठी विद्यालय सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत