“खेल रत्न” पुरस्कारासाठी मिताली राजच्या नावाची शिफारस

“खेल रत्न” पुरस्कारासाठी मिताली राजच्या नावाची शिफारस

Mithali Raj's name recommended for "Khel Ratna" award

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राजच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी मिताली राज व्यतिरिक्त भारताचा नंबरवन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​नावही पाठविण्यात येणार आहे. अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने तीन खेळाडूंची नावे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.अर्जुन पुरस्कारासाठी बोर्ड सीनियर फलंदाज शिखर धवन, लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे पाठवेल. गेल्या वर्षी धवनच्या नावाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, अर्जुन पुरस्कारासाठी कोणत्याही महिला क्रिकेटपटूचे नाव पाठवलेले नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन पुरस्कारासाठी कोणत्याही महिला क्रिकेटपटूला नामांकन मिळालेले नाही. खेल रत्नासाठी मितालीच्या नावाची शिफारस केली गेली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत