खालापुरात पहल कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची उभारणी रोजगाराच्या नवी संधी पहल नॅचरिंग लाईव्हज संस्था उपलब्ध करून देणार पहल नॅचरिंग लाईव्हज संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

(आकांक्षा देशमुख) खलापूर

खेडोपाड्यातील तरुणांकडे कला असते मात्र त्यांना योग्य मार्ग दाखवणारं कोणी नसत. मात्र आता खेडोपाडी मुलामुलींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी स्वावलंबी करण्याचे काम पहल केंद्र करत आहे. खालापूर येथे पहलचे नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. घरची परिस्थिती आणि शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगाराच्या नवी संधी पहल नॅचरिंग लाईव्हज संस्था उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.

संस्थापक अंकुश भारद्वाज यांनी प्रस्तावनेत खालापूर तालुका निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मुंबई पुण्यापासून जवळ असून सुद्धा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुला-मुलींना रोजगाराच्या आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी मिळत नसल्याने खालापूरची निवड केल्याचे सांगितले. गेल्या तीन महिन्यात गावोगावी, वाडीवस्तीवर फिरून शिक्षणात खंड पडलेल्या युवक-युवतींना प्रोत्साहित करत प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याशिवाय एक वेगळा उपक्रम राबवत तालुक्यातील ५४ कुटुंबांना भाजी लागवडीचे बी बियाणे ,खत देऊन त्यात शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आल्याचे संस्थापक भारद्वाज यांनी सांगितले. खालापूर येथील कौशल्य विकास केंद्र नर्सिंग, मोबाईल दुरुस्ती, वीजतंत्री याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून परसदारात भाजीपाला लागवडीची शास्त्रशुद्ध माहितीदेखील संस्थेतर्फे खेडोपाड्यात देण्यात येत आहे.

अंकुश भारद्वाज – संस्थापक
सरिता शुक्ला
सौरभ सिंग
वैशाली मेनन
रोहिदास राठोड