खारेपाटण चेकपोस्ट येथील तपासणीत दोघे पॉझिटिव्ह

खारेपाटण चेकपोस्ट येथील तपासणीत दोघे पॉझिटिव्ह

कणकवली : खारेपाटण चेकपोस्ट येथे आज पहाटे मुंबईहुन आलेल्या एका ट्रॅव्हल बस मधील २३ प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले.
त्यांना कुडाळ येथील कोव्हीड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर बाकीच्या २१ प्रवाश्यांना होम कॉरनटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जे काही शासनाने नियम घालून दिले आहेत.

त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग तसेच काही लक्षणे असतील तर लवकरात लवकर कोरोना चाचणी करून त्यावर उपचार घेणे जरुरीचे आहे. सर्वांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाच्या आरोग्य यंत्रणेला साथ देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत