खारघर शहर पोलीस व वाहतूक पोलिसांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे छत्र्यांचे वाटप

खारघर शहर पोलीस व वाहतूक पोलिसांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे छत्र्यांचे वाटप

Kharghar city police and traffic police distributed monsoon umbrellas by Raje Foundation Workers' Army

पनवेल – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पोलीस बंधू – भगिनींना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितुकाका खानविलकर, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी.डी.गायकवाड व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या सहकार्याने खारघर शहर पोलीस व खारघर वाहतूक पोलिसांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

WhatsApp Image 2021 07 14 at 8.43.24 PM

यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी साहेब, खारघर वाहतूक शाखेचे आनंद चव्हाण साहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस केवल महाडिक, तालुका संघटक प्रमुख ओमकार महाडिक, साम्राज्य न्यूजच्या साक्षी सागवेकर, लखबिर सिंग यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत