खारघर मुख्य महामार्गावर शुकशुकाट

खारघर मुख्य महामार्गावर शुकशुकाट

navi mumbai kharghar highway blocked by police

नवी मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सिडको भवनला घेराव घालण्याचे आंदोलन गुरुवारी २४ जून रोजी प्रकल्पग्रस्तांचे नियोजन होते. मात्र पोलिसांकडून पनवेल आणि खारघरमधील सिडको भवनच्या ठिकाणी जाण्यास आंदोलनकर्त्यांना अडवण्यात आले. त्याचप्रमाणे खारघर पनवेल- खारघर तसेच पुढे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मुख्य महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई खारघर महामार्गावर शुकशुकाट दिसून आला. नोकरदारांना बससेवा, रिक्षा अशी कोणतीच वाहने कामावर जाण्यासाठी उपलब्ध नव्हती. तसेच महामार्गावरून परवानगी नसल्याने नागरिक भरती विद्यापीठच्या छोट्या मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बेलपाडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत