“खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करून छत्रपती शाहू महाराजांचा वारस व्हा” – डॉ. जी. के. डोंगरगावकर

“खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करून छत्रपती शाहू महाराजांचा वारस व्हा” – डॉ. जी. के. डोंगरगावकर

become the successor of chatrapati shahu maharaj by implementing reservation in private sector - Dr. G.K. dongargavkar

नवी मुंबई- खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे आयोजन आज करण्यात आले होते.
या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन आणि कार्य या वर प्राचार्या नेहा राणे , प्रा .अमर हाडोतीकर , प्रा . सुभाष कांबळे यांनी आपले विचार मांडले . “सत्याचा शोध घेणारा आणि त्याची अमलबजावणारी करणारा विसाव्या शतकातील पहिला राजा छत्रपती शाहू महाराज आहे”, असे प्रा. राणे म्हणाल्या . “विसाव्या शतकात प्रशासनात पुरेशे प्रतिनिधित्व नसलेल्या समाज घटकाला संधी देण्याच आणि त्याचा दर्जा सिद्ध करण्याची संधी छत्रपती शाहू महाराजानी दिली हा त्यांचा न्याय बाणा आज गर्जेचा आहे . महाराच्या कांबळे ला हॉटेलचा परवाना देहून व्यवसाय करण्याचा हक्क देणारा राज्याचे विचार पालन करून आजच्या सरकारने मागासांना जागा , पाणी , भांडवल आणि प्रशिक्षण द्यावे . अमेरिकेतील उद्योगपतीला कर्ज देणाऱ्या सरकारने महाराष्ट्रातील मराठी भाषिक तरुणांना उद्योगपतींचे वेठबिगारी करू नका”, असे प्रा. सुभाष कांबळे म्हणाले .

WhatsApp Image 2021 06 26 at 7.42.55 PM 1

कोरोना महामारीचे प्रतिबंधात्मक नियम पळून संस्थेने संस्थेतील सर्व शिक्षकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल जेष्ट विचारवंत डॉ. जी . के. डोंगरगावकर यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “छत्रपती शाहू महारा जांचा वारसा जपणा ऱ्या सिडको भूखंड देत नाही अशी खंत वेक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा अस्पृश्यांचा नव्हे तर तमाम जनतेचा नेता म्हणणारा राजा छत्रपती शाहू महाराज आहेत ते बोलके सुधारक नव्हे तर करते सुधारक आहेत . त्यांच्या विचारांचा वारसा आज सरकारने जपण्याची आवश्यकता आहे . नव्या आर्थिक धोरणाने गरीब ब्राह्मण मराठा, बौद्ध, माळी , वंजारी, धनगर,आगरी, आदिवासी, या सह अठराशेबावन्न अनुसुचित जाती जमाती विकासापासून वंचित आहे.”

WhatsApp Image 2021 06 26 at 7.42.55 PM

“सरकारी शाळा कॉलेज आणि उद्योगाचे खाजगी कारण झाल्यामुळे सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ शकत नाहीत त्या मुळे छत्रपती शाहू , छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आरक्षणाची मागणी करत आहेत”, असे डोंगरगावकर म्हणाले . खाजगी क्षेत्रात आरक्षण अनुसूचितजातीजमातींना त्यांच्या सामाजिक आणि मराठा ब्राह्मण ओबीसी यांना आर्थिक निकश्यावर आरक्षण लागू करावे असे म्हणाले .

सुजाता भोसले यांनी प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांनी छत्रपती शाहू महाराजांना पुष्पार्पण केले. उपस्थितांना भारताचे संविधान देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली . संस्थेतील शिक्षक सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद गायकवाड, लक्ष्मण गोसावी उपस्थित होते .

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत