क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती सामाजिक उपक्रम घेऊन सन म्हणून घरोघरी साजरी करणार – गोपाल भैय्या चव्हाण

क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती सामाजिक उपक्रम घेऊन सन म्हणून घरोघरी साजरी करणार – गोपाल भैय्या चव्हाण

महापुरुषांचे विचार घरा घरा पहोचवण्याचे कार्य करत राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचा उपक्रम

प्रतिनिधी / गेवराई

स्त्रिशिक्षनाचा पाया रचनारे शिवजंतीचे जनक थोर समाजसुधारक राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांची येत्या ११ एप्रिल रोजी जयंती तर महामानव घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी करत कोरोणा प्रस्थितीचा विचार करत वाचन करत घरीच प्रतिमा पुजन व अन्य उपक्रमातुन हा राष्ट्रीय सन म्हणून घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आव्हान राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन करण्यात आले आहे

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी बहुजन समाजातील अज्ञान, दारिद्र्य, जातिभेद नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा १८४८ मध्ये पुणे येथील बुधवार पेठेत स्त्रिशिक्षनाचा पाया रचला रूढी, प्रथा, परंपरेला मातीत गाडीत स्त्रीयांना सन्मानाने जगता यावे, स्त्रीयानांही पुरुषाप्रमाणे कुठल्याही ठिकाणी आपले अधिकार गाजवण्याचा अधिकार आहे हे केवळ त्यांना शिक्षनाने मिळु शकते हे महात्मा फुले यांना माहित होते त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले,नंतर सावित्रीमाई फुले यांनी मुली, महिला यांना शिक्षण देऊन त्यांना या जगात आपली ओळख निर्माण करण्याचा, अधिकार गाजवण्याचा अधिकार मिळून दिला फुले दाम्पत्यांना स्त्री यांना शिक्षण देत आसतांत पावलोपावली अथक त्रास सहन करावा लागला यात्रासाला नजुमनता देशात क्रांती घडवून आनली फुले दाम्पत्यांनी आनेक शाळा सुरू केल्या व बहुजन समाजातील तळागाळातील सर्व सामान्याना न्याय, हक्क मिळुन दिले. रूढी, पंथा,परंपरेला मातीत गाडीत जातिभेद नष्ट करण्याचे काम महात्मा जोतिराव फुले यांनी केला. तर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यानी गोरगरीब वंचित पिढीताना न्याय देत जाती भेद नष्ट करत देशाला आदर्श अशी सविधान दिले घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यानी छञपती शिवराय याना आदर्श माणत कार्य केले आहे अशा महान थोर समाजसुधारक , महापुरुषांची जयंती त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी राष्ट्रीय सन म्हणून घरोघरी साजरी करावी व महामानवाचे विचार आचार प्रत्येकानी आत्मसात करावे असे आव्हान राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार सुनिल मिसाळ युवा नेते अशोक तौर, पञकार देवराज कोळे, महेश मस्के,राम कटारे , राजु खळगे, भुषन वक्ते , युवा नेते नितीन पवार , रंजित शर्मा,अभिजीत मरकड , दादा चव्हाण, आकाश चव्हाण,शरद बनसोडे,बाळासाहेब लेंङाळ, बाळासाहेब लगड , शुभम घोडके , यानी काकासाहेब पवार, केले आहे
administrator

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत