कोविड-19 च्या होम टेस्ट किट ‘कोविसेल्फ’ चा कोण आणि कसा वापर करु शकता? पहा Video

कोविड-19 च्या होम टेस्ट किट ‘कोविसेल्फ’ चा कोण आणि कसा वापर करु शकता? पहा Video

घरच्या घरी कोविड टेस्ट करण्यासाठी ‘कोविसेल्फ’ किटला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. या किटचा वापर नेमका कसा आणि कोणी करायचा याची माहिती करुन घेऊया.

सध्या देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढला आहे. मात्र या कठीण काळात आता पूर्वीप्रमाणे कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यासाठी लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी कोरोना चाचणी करु शकता. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) ‘कोविसेल्फ’ किटला मंजूरी दिली आहे. या किटद्वारे नागरिक आता घरच्या घरी केवळ 250 रुपयांत कोविड टेस्ट करु शकतात. यासाठी आयसीएमआरने (ICMR) अॅडव्हायजरी जारी केल्या आहेत. यात विनाकारण टेस्ट न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

‘कोविसेल्फ’ किटद्वारे कोण करु शकतं कोविड टेस्ट?

कोरोनाचे लक्षण दिसत असलेले आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले लोकच रैपिड एंटीजन टेस्ट ‘कोविसेल्फ’ किटद्वारे करु शकतात. दरम्यान, या किटच्या विक्रीसाठी DCGI ने मंजूरी दिली असून बाजारात उपलब्ध होण्यासाठी काही अवधी लागू शकतो.

कोविड टेस्ट करण्यासाठी ‘कोविसेल्फ’ किटचा वापर कसा कराल?

# सर्वप्रथम मोबाईलमध्ये मायलॅब अॅप डाऊनलोड करा.

# या अॅपमध्ये तुम्हाला टेस्टिंग प्रक्रीया कळेल आणि टेस्टचा रिपोर्टही समजेल.

# विशेष म्हणजे या रैपिड एंटीजन टेस्टमध्ये केवळ नोजल स्वॅबची गरज असेल.

# टेस्टिंग प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर टेस्टिंग स्ट्रिपचा फोटो काढा. या फोटोचा वापर अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी होईल.

# टेस्टिंग रिपोर्ट समजण्यासाठी 15 मिनिटे वाट पाहावी लागेल.

#टेस्ट किटमध्ये दोन भाग असतील- 1. कंट्रोल सेक्शन 2. टेस्ट सेक्शन

# जर तुमचा बार कंट्रोल सेक्शनवर (C) वर असेल तर तुमचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे. पण जर बार टेस्ट सेक्शन आणि कंट्रोल सेक्शन दोघांवर (T) असेल तर तुमची टेस्ट पॉझिटीव्ह आहे.

विशेष म्हणजे या किटद्वारे टेस्ट केल्यानंतर पॉझिटीव्ह रिपोर्ट्स आल्यास पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. मात्र निगेटीव्ह रिपोर्ट येऊनही कोरोना लक्षणे दिसत असल्यास तातडीने आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत