कोरोना व्हायरस : साथीच्या काळात सेक्स करणं किती सुरक्षित?

कोरोना व्हायरस : साथीच्या काळात सेक्स करणं किती सुरक्षित?

कोरोनाच्या संकटातून वाट काढताना ‘न्यू नॉर्मल’ हा शब्द आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. कामावर जाताना किंवा अगदी शॉपिंग करायला जाताना कोरोना विषाणूचीलागण होणार नाही, याची सर्व खबरदारी घेणं, याला ‘न्यू नॉर्मल’ म्हणण्यात आलं आहे.

113919126 79328b89 73dd 465b 9c4a bb1a51d22052

मात्र, हे न्यू नॉर्मल केवळ एवढ्याच गोष्टींसाठी मर्यादित नाही तर आता सेक्ससुद्धा न्यू नॉर्मल पद्धतीने करण्याची गरज आहे.

द टेरेंस हिगिंस ट्रस्ट (The Terrence Higgins Trust) या संस्थेने कोरोना काळात सुरक्षित सेक्ससंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

किस करणं टाळावं, चेहऱ्याला मास्क बांधावे आणि संभोगावेळी चेहेरा समोरासमोर येणार नाही, अशाच पोझिशन्स असाव्या, अशा काही सूचना या संस्थेने दिल्या आहेत. THT ही युकेतली HIV आणि सेक्च्युअल हेल्थ याविषयांवर काम करणारी नामांकित स्वयंसेवी संस्था आहे.

कायला अवघड वाटत असलं तरी “कामेच्छा, शारीरिक आणि भावनिक जवळीकीची नैसर्गिक इच्छा पूर्ण करणं आणि हे करताना कोव्हिड-19 चा फैलाव होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे,” असं या संस्थेचं म्हणणं आहे.

सुरक्षित सेक्स

कोरोना साथीच्या काळात तुम्ही स्वतःच स्वतःचे सर्वोत्तम सेक्स पार्टनर आहात, असं या संस्थेचं म्हणणं आहे. शिवाय, एकाच घरात राहणारेच सर्वांत सुरक्षित सेक्स पार्टनर आहेत.

113919541 e9de4835 7b5b 47b7 a307 93c1c5daa737

या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सेक्स टॉय किंवा ऑनलाईन सेक्सच्या माध्यमातून मास्टरबेशन (हस्तमैथुन) हा सध्या सेक्ससाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, याचा अर्थ जोडीदाराबरोबर सेक्स करूच नये, असा होत नाही. तर तुमच्या घरातच तुम

च्या सोबत एकत्र राहणाऱ्या जोडीदारासोबतच संभोग करावा, कारण ते अधिक सुरक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

जगभरात अजूनही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लोकांनी अनिश्चित काळासाठी सेक्स करणं थांबवावं, अशी अपेक्षा चुकीची असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

घराबाहेरच्या जोडीदाराबरोबर सेक्स करणार असाल तर खूप जास्त लोकांबरोबर करू नका. त्यांची संख्या अगदीच मोजकी असायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे.

तसंच स्वतःला किंवा आपल्या जोडीदाराला कोव्हिड-19 आजाराची काही लक्षणं आहेत का, याकडे लक्ष ठेवा आणि लक्षणं आढळल्यास स्वतःला विलग करा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

शिवाय, नव्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणार असाल तर सेक्सआधी त्याला किंवा त्याच्या कुटुंबातल्या इतर कुणाला कोव्हिडची लक्षणं आहेत का, त्यांच्या घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे का, याची विचारपूस जरूर करा.

113919543 5005d524 82c7 4f40 aab0 53f854f57d74

सेक्समधून विषाणूची लागण होते का?

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीचा सलाईव्हा (लाळ), म्युकस (श्लेष्मा) आणि श्वासातून या विषाणूची लागण होऊ शकते. तसंच संक्रमित पृष्ठभागावरूनही संसर्ग होऊ शकतो.

सेक्शुअल हेल्थविषयक तज्ज्ञ डॉ. अॅलेक्स जॉर्ज यांनी रेडियो-1 न्यूजबीटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “तुम्ही एकमेकांच्या गुप्तांगांना स्पर्श करणार असाल तर तुम्ही एकमेकांचं चुंबन घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही आणि लाळेतून कोरोनाच्या विषाणूची लागण होते.”

ते म्हणतात, “तुमच्या तोंडातून तुमच्या हातात, गुप्तांगांत, दुसऱ्या व्यक्तीच्या नाकात किंवा तोंडात कोरोनाचे विषाणू स्पर्श करण्याची शक्यता असल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.”

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत